धनाजी जाधव आणि त्याचा वंश
धनाजी जाधव आणि त्याचा वंश:-
संभाजीचा वध झाल्यावर आतां पुढें काय करावें हें ठरविण्याकरितां जी मुख्य मुख्य मराठे मंडळी रायगडावर जमली त्यांत धनाजी जाधव होता. त्यानें सातार्यास सर्जाखानाचा पराभव केला.
पुढें (१६९०) धनाजी राजारामाबरोबर जिंजीस गेला. तेथें त्यानें इस्मायलमकाचा पराभव केला, यावेळीं महादजी नाईक पानसंबळ याच्या मृत्यूचें वर्तमान समजल्यामुळें संताजी घोरपडे यास सेनापति नेमण्यांत येऊन त्याच्याबरोबर धनाजीस जयसिंगराव ही पदवी देऊन महाराष्ट्रांत पाठविण्यांत आलें (१६९०).
महाराष्ट्रांत १६९२ सालीं संताजीच्या वांईकडील व गोदेच्या उत्तरतीरींच्या मोहिमांत बरोबर धनाजी होता. धनाजीच्या सैन्यांत संताजीच्या इतकी चांगली शिस्त नव्हती पण तो आपल्या लोकांनां अधिक प्रिय होता. इकडे धनाजीनें अमात्य व सचिव यांच्याबरोबर पन्हाळा घेतला.
धनाजी हा संताजी घोरपडयाबरोबर महाराष्ट्रांतून पुन्हां कर्नाटकांत आल्यावर (१६९३) पुढील वर्षें तो संताजीबरोबरच होता. परंतु शेवटीं शेवटीं या दोन्ही सरदारांमध्यें वैमनस्य उत्पन्न होऊन धनाजीनें संताजीच्या सैन्यांतील कांहीं लोकांस फितविलें, व एके दिवशीं विजापुराजवळ संताजीवर एकदम हल्ला केला. संताजी आपला जीव वांचवून कसा तरी तेथून निसटला, तेव्हां कांहीं लोकांनां त्याच्या पाठलागार्थ पाठवून, व कांहींनां सातार्यास राजारामाकडे रवाना करून धनाजी अर्ध्या लोकांसह (सुमारें १०००० फौज) झुल्फिकारखानाचा समाचार घेण्याकरितां पुन्हां कर्नाटकांत आला. यापुढें दोन वर्षें धनाजीची व झुल्फिकारखानाची कर्नाटकांत झटापट चालू होती. त्यावेळीं व त्यानंतर धनाजीनें कर्नाटकांत व महाराष्ट्रांत सर्व बाजूस आपली फौज पसरून मोंगलाशीं चाललेल्या युद्धांत बरेच नांवाजण्यासारखे पराक्रम केले (१७०३-०५) त्यामुळें औरंगझेब फार चिडला परंतु, त्याच्यानें मराठयांचा पुरा पराभव होईना.
औरंगझेब महाराष्ट्रांतील किल्ले घेण्यांत गुंतला होता. तेव्हां धनाजीनें आपलीं बायकामुलें वाघिणगिरें येथें आणून ठेविलीं होतीं. इ. स. १७०५-०७ च्या सुमारास औरंगझेबानें तेथील गढीस वेढा दिला, तेव्हां धनाजी मोंगलांच्या सैन्याभोंवतीं घिरटया घालून त्यांनां त्रास देत होता. धनाजीचा मोंगलांच्या शिपायांस इतका धाक बसला होता कीं, तो आलेला दृष्टीस पडतांच ते पळावयास लागत. अशी एक आख्यायिका आहे कीं, आपल्या पडछायेस पाहून दचकून जेव्हां घोडा पाणी पीत नसे तेव्हां मोंगल स्वार 'तुला पाण्यांत धनाजी दिसतो कीं काय?' असें घोडयास विचारीत. मध्यंतरी (१७०७) घोरपडयांनीं ताराबाईच्या मुलखांत लुटालूट केल्यामुळें धनाजी त्याच्या पारिपत्यास गेला असतां झुल्फिकारखान घोरपडयांच्या मदतीस आला, व त्यानें धनाजीस कृष्णेपार काढून दिलें. यानंतर मोंगलांचें सैन्य महाराष्ट्रांतून निघून गेल्याबरोबर धनाजीनें पुण्याचा फौजदार लोदीखान याचा पराभव करून चाकणचा किल्ला परत घेतला.
यानंतर मोंगलांच्या छावणींतून शाहूची सुटका होऊन तो महाराष्ट्रांत आला, तेव्हां ताराबाईकडून धनाजी जाधवाची त्याच्यावर रवानगी झाली होती. परंतु धनाजीनें शाहू हा तोतया नसून खरा आहे असें ओळखून तो त्याला मिळाला. पुढें शाहू गादीवर बसला तेव्हां त्यानें धनाजीस सेनापतीच्या जागीं कायम नेलें, व त्याच्याकडे कांहीं जिल्ह्यांचा वसूल गोळा करण्याचें काम दिलें (१७०८). धनाजी हा अखेरपर्यंत कोल्हापूरच्या विरुद्ध शाहूकडेच राहिला. कोल्हापूरकर मात्र त्याला फोडण्याचा प्रयत्न करीत होते.
पुढल्या वर्षीं धनाजी हा कोल्हापूरकरावरील रांगण्याच्या मोहिमेवरून परत येत असतां वारणा नदीच्या कांठीं वडगांव येथें मरण पावला (मे १७१०). त्याला कित्येक दिवसांपूर्वीं झालेली एक जखम पुन्हां वाहूं लागल्यामुळें तो बरेच दिवसपर्यंत आजारी होता. या आजारांत त्यानें वसुलाच्या कामाकरितां बाळाजी विश्वनाथ याची नेमणूक केली होती.
धनाजीची स्त्री गोपिकाबाई ही सती गेली. धनाजीस दोन बायका होत्या. पहिलीस संताजी व दुसरीस चंद्रसेन आणि शंभुसिंग असे पुत्र होते. पैकीं चंद्रसेन हा पुढें सेनापति झाला. शिवाजीच्या तालमींत तयार झालेला धनाजी हा शाहूच्या कारकीर्दीत शेवटचाच पुरुष होय. धनाजी हा सत्तेच्या जोरावर लोकांचे वतनी हक्क दडपण्यास कमी करीत नसे हें गसूर व कर्हाडच्या देशमुखीच्या तत्कालीन तंटयावरून दिसून येतें.
चंद्रसेन जाधव:- हा धनाजीचा मुलगा. धनाजी आजारी असतांना बाळाजी विश्वनाथ हा त्याचा कुल कारभार पाहूं लागला, तेव्हां त्याच्या मनांत बाळाजीविषयीं मत्सर उत्पन्न झाला. वास्तविक चंद्रसेनाचा ओढा ताराबाईकडे होता व तो आंतून तिला (शाहूच्या विरुद्ध) फितूरहि झाला होता.
धनाजीच्या मरणानंतर चंद्रसेनाकडे सेनापतित्व आलें. इ. स. १७१३ मध्यें मोगलाईंतून चौथ, सरदेशमुखी व घांसदाणा हे हक्क वसूल करण्याकरितां चंद्रसेनाची योजना झाली होती. या प्रसंगीं वरील हक्कांपैकीं सरदेशमुखी गोळा करण्याकरितां चंद्रसेनाबरोबर बाळाजी विश्वनाथाची नेमणूक झाली असल्यामुळें बाळाजीविषयीं चंद्रसेनाचा द्वेषाग्नि अधिकच भडकला. त्यानें क्षुल्लक कारणावरून (हरणाचा तंटा) कुरापत काढून बाळाजीचा पाठलाग केला व (शाहूच्या आज्ञेवरून) त्यास पांडवगडामघ्घें आश्रय मिळाला असतां चंद्रसेनानें त्या किल्ल्यास वेढा दिला, व बाळाजीस आपल्या हवालीं करण्याविषयीं शाहूजवळ उर्मटपणानें मागणी केली. शाहूनें हैबतराव निंबाळकरास जाधवाचें पारिपत्य करण्यास पाठविलें. निंबाळकरानें जेऊरजवळ चंद्रसेनाचा पराभव केला; तेव्हां तो उघडपणें कोल्हापूरकर संभाजीकडे गेला; परंतु पुढें लवकरच दक्षिणेंत निजामउल्मुल्क आल्यावर त्यानें निजामाच्या पदरीं चाकरी धरली व शाहूचा पाडाव करण्याची खटपट चालविली. बेदरच्या पूर्वेस २५ मैलांवर भालकी येथें बरीच मोठी जहागीर निजामानें जाधवास देऊन त्यास आपल्या पदरीं ठेविलें. मराठेशाहीस निजाम यापुढें त्रास देई तो याच्याच बळावर. चंद्रसेनास शाहूनें वळवून घेतलें असतें तर निजामाच्या कायमचा त्रास मिटला असता. इ. स. १७१६ मध्यें सय्यदबंधु हुसेन अल्लीखान याचा दिवाण महकबसिंग व खंडेराव दाभाडे यांच्या दरम्यान अहमदनगराजवळ जी लढाई झाली तींत चंद्रसेन मोंगलांकडून लढत होता.
इ. स. १७२० मध्यें निजामउल्मुल्क हा मोंगल बादशहापासून स्वतंत्र होण्याच्या उद्देशानें दक्षिणेंत आला तेव्हां चंद्रसेन जाधव त्याच्या सैन्यास जाऊन मिळाला. बाळापुरच्या लढाईंतहि चंद्रसेन निजामाकडून लढला. स. १७२५ त तर चंद्रसेनानेंच निजामास शाहूविरुद्ध उठविलें होतें.
इ. स. १७२७-२८ मध्यें निजाम व बाजीराव यांच्यामध्यें जें युद्ध झालें, त्यांत चंद्रसेन लढत होता. त्यानेंच संभाजीस शाहूकडे राज्याचा हिस्सा मागण्यास चिथविलें होतें. त्यानें १७३९ सालीं संभाजीचा पक्ष घेऊन बीडकडे धुमाकूळ घातला. हा १७५१ सालीं मरण पावला.
रामचंद्र जाधव:- हा चंद्रसेनाचा मुलगा. इ. स. १५५६ त हैद्राबादचा नबाब सलाबतजंग यानें रामचंद्र जाधव व रावरंभा निंबाळकर यांनां बुशीच्या पाठलागार्थ त्याच्या मागोमाग पाठविलें होतें परंतु बुशी आपलें फारसें नुकसान न होऊं देतां हैद्राबादेस जाऊन पोंचला. यानंतर बुशीनें याला आपल्याकडे वळवून घेतल्यामुळें यानें मच्छलीपट्टणाहून बुशीच्या मदतीस हैद्राबादेस जी कुमक येत होती तिला मुळींच अडथळा केला नाहीं.
स. १७५६ च्या अखेरीस बुशी आपल्या पूर्वकिनार्यावरील जहागिरीकडे निघून गेल्यावर, बुशीकडे जी कुमक आली होती, तिला अडविण्याच्या कामीं रामचंद्र जाधवानें जी हयगय केली, तिजबद्दल त्याचें पारिपत्य करण्यासाठीं, सलाबत जंगानें त्याजवर स्वारी करून, त्याची बहुतेक जहागीर त्याजकडून काढून घेतली. बाह्यत: मात्र, रामचंद्र जाधवानें कराराप्रमाणें चाकरीस ठेवावयास पाहिजे तेवढी फौज ठेविली नाहीं, असें या स्वारीचें कारण दाखविण्यांत आलें होतें. उदागीरच्या लढाईंत हा निजामाकडेच होता. स. १७६१ मध्यें निजामअल्लीनें गोदावरीतीरीं असलेल्या कायगांव टोकें नांवाच्या गांवातील हिंदु देवळें उध्वस्त केल्यावरून, रामचंद्र जाधव मोंगलांनां सोडून मराठयांच्या पक्षास मिळाला.
इ. स. १७६२ त राघोबादादानें याला सेनापतीचीं वस्त्रें दिलीं. परंतु सेनापति या नात्यानें गुजराथप्रांतहि आपल्या ताब्यांत देण्यांत येईल अशी जी यास आशा होती, ती सफळ न झाल्यानें हा लवकरच पुढें पुन्हां निजामअल्लींकडे गेला. रामचंद्र हा स. १७६९ त निजामकडून मारला गेला. त्याचा पुत्र खाशेराव ह्यास भालकीची जहागीर मिळाली होती. तो टिप्पूबरोबरच्या एका लढाईंत ठार झाल्यावर (१७९१) त्याची जहागीर खालसा झाली. सांप्रत याचा वंश निजामहींत नांदत आहे. [जाधवांची कैफियत; डफ, राजाराम व शाहु यांच्या बखरी; खाफीखान; पेशव्यांची बखर.]
धनाजी जाधव यांची वंशावळ पुढीलप्रमाणे
अनिरुद्ध
प्रतिबाहु
सुबाहु
दृढप्रहर (द्वारकेहून चंद्रादित्यपूर/चांदोर ला राजधानी आणली)(८६०-८८०)
स्युनचंद्र १ (श्रीनगर/सिन्नर नगर वसवून तेथे राज्य स्थापले)(८८०-९००)
धडीयप्पा १
भिल्लम १
श्रीराज
वद्दीग १ (९५०-९७०)
धडीयप्पा २ (९७०-९७५)
भिल्लम २ (९७५-१००५)
वेसुगी १
अर्जुन
भिल्लम ३ (१०२०-१०४५)
वद्दीग २
वेसुगी २
भिल्लम ४
स्युनचंद्र २
सिंघण १
मल्लूगी
भिल्लम ५ (स्वतंत्र देवगिरी राजधानी वसविले व सार्वभौमत्व घोषित केले)(११८५-११९३)
जैत्रपाल १ (काकतीयांशी लढताना युद्धात मारले गेले)(११९३-१२००)
सिंघण २ (सम्राट उपाधी घेतली)(१२००-१२४६)
जैत्रपाल २ (वडिलांच्या हयातीत मृत्यू)
कृष्णदेव (आजोबांचा उत्तराधिकारी झाला)(१२४६-१२६१)
रामचंद्रदेव (खिळजीचे मांडलीकत्व पत्करले)(१२७०-१३११)
शंकरदेव ( खिळजीकडून पराभव )(१३११-१३१८)
गोविंददेव (जाधव आडनाव सुरू केले व बहमणींकडून जहागिरी मिळविली)(१३१८-१३८०)
ठाकुरजी (१३८०-१४२९)
भूकनदेव/भूतजी (१४२९-१५००)
अचलकरण (१५००-१५४०)
विठ्ठलदेव (१५४०-१५७०)
लक्ष्मणदेव / लखुजी जाधवराव (स्वबळावर निजमशाहीस दौलताबाद जिंकून देऊन १२००० मनसब मिळविली , काही काळ मोघळाईत गेले व परत निजामशाहीत आल्यावर दौलताबाद येथे दरबारात हत्या)(१५७०-१६२९)
अचलोजी (पित्यासह हत्या)
संताजी (राजमाता जिजाऊंनी आपल्याबरोबर पुण्यास आणले , कनकगिरीच्या युद्धात मृत्यू)
शंभूसिंह (शिवरायांच्या सेवेत विशाळगडाच्या लढाईत मारले गेले)
धनाजी
धनाजींचा जन्म स. १६५० च्या सुमारास झाला. हे प्रथम प्रतापराव गुजराच्या हाताखालीं होते. उंबराणीच्या लढाईत तो प्रथम पुढें आला. पुढें (१६७४) धनाजी हे हंबीरराव मोहिते यांंच्या हाताखालीं गेले. विजापूरचा सेनापति अबदुलकरीम याशीं झालेल्या नेसरीच्या लढाईत यांंनें विशेष शौर्य दाखविल्यामुळें यांंस बढती देण्यांत आली (फेब्रु.) सावनूरच्या लढाईंत यांंनें हुसेनखान मायणा याचा पुरा मोड केला तेव्हां शिवाजी महाराजांनें याची तारीफ केली (१६७९).
संभाजी महाराजांचा वध झाल्यावर आतां पुढें काय करावें हें ठरविण्याकरितां जी मुख्य मुख्य मराठे मंडळी रायगडावर जमली त्यांत धनाजी जाधव होते. त्यांंनें सातार्यास सर्जाखानाचा पराभव केला.
पुढें (१६९०) धनाजी छत्रपती राजाराम महाराजांबरोबर जिंजीस गेले. तेथें त्यांंनें इस्मायलमकाचा पराभव केला, यावेळीं सरनौबत महादजी नाईक पानसंबळ याच्या मृत्यूचें वर्तमान समजल्यामुळें संताजी घोरपडे यांंस सेनापति नेमण्यांत येऊन त्याच्याबरोबर धनाजींंस जयसिंगराव ही पदवी देऊन महाराष्ट्रांत पाठविण्यांत आलें (१६९०).
महाराष्ट्रांत १६९२ सालीं संताजींंच्या वांईकडील व गोदेच्या उत्तरतीरींच्या मोहिमांत बरोबर धनाजी होते. धनाजींंच्या सैन्यांत संताजीच्या इतकी चांगली शिस्त नव्हती पण ते आपल्या लोकांनां अधिक प्रिय होते. इकडे धनाजींंनें अमात्य व सचिव यांच्याबरोबर पन्हाळा घेतला.
धनाजी हे संताजी घोरपडयांंबरोबर महाराष्ट्रांतून पुन्हां कर्नाटकांत आल्यावर (१६९३) पुढील वर्षें ते संताजींंबरोबरच होते. परंतु शेवटीं शेवटीं या दोन्ही सरदारांमध्यें वैमनस्य उत्पन्न होऊन धनाजींंनें संताजींंच्या सैन्यांतील कांहीं लोकांस फितविलें, व एके दिवशीं विजापुराजवळ संताजींंवर एकदम हल्ला केला. संताजी आपला जीव वांचवून कसे तरी तेथून निसटले, तेव्हां कांहीं लोकांनां त्याच्या पाठलागार्थ पाठवून, व कांहींनां सातार्यास राजारामा महाराजांकडे रवाना करून धनाजी अर्ध्या लोकांसह (सुमारें १०००० फौज) झुल्फिकारखानाचा समाचार घेण्याकरितां पुन्हां कर्नाटकांत आले. यापुढें दोन वर्षें धनाजींंची व झुल्फिकारखानाची कर्नाटकांत झटापट चालू होती. त्यावेळीं व त्यानंतर धनाजींंनें कर्नाटकांत व महाराष्ट्रांत सर्व बाजूस आपली फौज पसरून मोंगलाशीं चाललेल्या युद्धांत बरेच नांवाजण्यासारखे पराक्रम केले (१७०३-०५) त्यामुळें औरंगझेब फार चिडला परंतु, त्याच्यानें मराठयांचा पुरा पराभव होईना.
औरंगझेब महाराष्ट्रांतील किल्ले घेण्यांत गुंतला होता. तेव्हां धनाजींंनें आपलीं बायकामुलें वाघिणगिरें येथें आणून ठेविलीं होतीं. इ. स. १७०५-०७ च्या सुमारास औरंगझेबानें तेथील गढीस वेढा दिला, तेव्हां धनाजी मोंगलांच्या सैन्याभोंवतीं घिरटया घालून त्यांनां त्रास देत होते. धनाजींंचा मोंगलांच्या शिपायांस इतका धाक बसला होता कीं, ते आलेले दृष्टीस पडतांच ते पळावयास लागत. अशी एक आख्यायिका आहे कीं, आपल्या पडछायेस पाहून दचकून जेव्हां घोडा पाणी पीत नसे तेव्हां मोंगल स्वार 'तुला पाण्यांत धनाजी दिसतो कीं काय?' असें घोडयास विचारीत. मध्यंतरी (१७०७) घोरपडयांनीं ताराबाईच्या मुलखांत लुटालूट केल्यामुळें धनाजी त्याच्या पारिपत्यास गेले असतां झुल्फिकारखान घोरपडयांच्या मदतीस आला, व त्यानें धनाजींंस कृष्णेपार काढून दिलें. यानंतर मोंगलांचें सैन्य महाराष्ट्रांतून निघून गेल्याबरोबर धनाजींंनें पुण्याचा फौजदार लोदीखान याचा पराभव करून चाकणचा किल्ला परत घेतला.
यानंतर मोंगलांच्या छावणींतून शाहूराजांची सुटका होऊन ते महाराष्ट्रांत आले, तेव्हां ताराबाईंंकडून धनाजी जाधवांंची त्याच्यावर रवानगी झाली होती. परंतु धनाजींंनें शाहू हा तोतया नसून खरा आहे असें ओळखून ते त्याला मिळाले. पुढें शाहूराजे गादीवर बसले तेव्हां त्यानें धनाजींंस सेनापतीच्या जागीं कायम नेलें, व त्याच्याकडे कांहीं जिल्ह्यांचा वसूल गोळा करण्याचें काम दिलें (१७०८). धनाजी हे अखेरपर्यंत कोल्हापूरच्या विरुद्ध शाहूकडेच राहिले. कोल्हापूरकर मात्र त्यांंना फोडण्याचा प्रयत्न करीत होते.
पुढल्या वर्षीं धनाजी हे कोल्हापूरकरावरील रांगण्याच्या मोहिमेवरून परत येत असतां वारणा नदीच्या कांठीं वडगांव येथें मरण पावले (मे १७१०). त्यांंना कित्येक दिवसांपूर्वीं झालेली एक जखम पुन्हां वाहूं लागल्यामुळें ते बरेच दिवसपर्यंत आजारी होते. या आजारांत त्यांंनें वसुलाच्या कामाकरितां बाळाजी विश्वनाथ यांंची नेमणूक केली होती.
धनाजींंची स्त्री गोपिकाबाई ही सती गेली. धनाजींंस दोन बायका होत्या. पहिलीस संताजी व दुसरीस चंद्रसेन आणि शंभुसिंह असे पुत्र होते. पैकीं चंद्रसेन हा पुढें सेनापति झाला. शिवाजी महाराजांच्या तालमींत तयार झालेला धनाजी हा शाहूच्या कारकीर्दीत शेवटचाच पुरुष होय. धनाजी हे सत्तेच्या जोरावर लोकांचे वतनी हक्क दडपण्यास कमी करीत नसे हें गसूर व कर्हाडच्या देशमुखीच्या तत्कालीन तंटयावरून दिसून येतें.
चंद्रसेन जाधव:- हा धनाजीचा मुलगा. धनाजी आजारी असतांना बाळाजी विश्वनाथ हे त्यांंचा कुल कारभार पाहूं लागले, तेव्हां त्याच्या मनांत बाळाजींंविषयीं मत्सर उत्पन्न झाला. वास्तविक चंद्रसेनाचा ओढा ताराबाईंंकडे होता व तो आंतून तिला (शाहूराजांच्या विरुद्ध) फितूरहि झाला होता. धनाजींंच्या मरणानंतर चंद्रसेनाकडे सेनापतित्व आलें. इ. स. १७१३ मध्यें मोगलाईंतून चौथ, सरदेशमुखी व घांसदाणा हे हक्क वसूल करण्याकरितां चंद्रसेनाची योजना झाली होती. या प्रसंगीं वरील हक्कांपैकीं सरदेशमुखी गोळा करण्याकरितां चंद्रसेनाबरोबर बाळाजी विश्वनाथांंची नेमणूक झाली असल्यामुळें बाळाजींंविषयीं चंद्रसेनाचा द्वेषाग्नि अधिकच भडकला. त्यानें क्षुल्लक कारणावरून (हरणाचा तंटा) कुरापत काढून बाळाजींंचा पाठलाग केला व (शाहूराजांंच्या आज्ञेवरून) त्यास पांडवगडामघ्घें आश्रय मिळाला असतां चंद्रसेनानें त्या किल्ल्यास वेढा दिला, व बाळाजींंस आपल्या हवालीं करण्याविषयीं शाहूराजां जवळ उर्मटपणानें मागणी केली. शाहूराजांनें हैबतराव निंबाळकरास जाधवाचें पारिपत्य करण्यास पाठविलें. निंबाळकरानें जेऊरजवळ चंद्रसेनाचा पराभव केला; तेव्हां तो उघडपणें कोल्हापूरकर संभाजीराजांकडे गेला; परंतु पुढें लवकरच दक्षिणेंत निजामउल्मुल्क आल्यावर त्यानें निजामाच्या पदरीं चाकरी धरली व शाहूराजांचा पाडाव करण्याची खटपट चालविली. बेदरच्या पूर्वेस २५ मैलांवर भालकी येथें बरीच मोठी जहागीर निजामानें जाधवास देऊन त्यास आपल्या पदरीं ठेविलें. मराठेशाहीस निजाम यापुढें त्रास देई तो याच्याच बळावर. चंद्रसेनास शाहूनें वळवून घेतलें असतें तर निजामाच्या कायमचा त्रास मिटला असता. इ. स. १७१६ मध्यें सय्यदबंधु हुसेन अल्लीखान याचा दिवाण महकबसिंह, खंडेराव दाभाडे यांच्या दरम्यान अहमदनगराजवळ जी लढाई झाली तींत चंद्रसेन मोंगलांकडून लढत होता.
इ. स. १७२० मध्यें निजामउल्मुल्क हा मोंगल बादशहापासून स्वतंत्र होण्याच्या उद्देशानें दक्षिणेंत आला तेव्हां चंद्रसेन जाधव त्याच्या सैन्यास जाऊन मिळाला. बाळापुरच्या लढाईंतहि चंद्रसेन निजामाकडून लढला. स. १७२५ त तर चंद्रसेनानेंच निजामास शाहूविरुद्ध उठविलें होतें.
इ. स. १७२७-२८ मध्यें निजाम व बाजीराव यांच्यामध्यें जें युद्ध झालें, त्यांत चंद्रसेन लढत होता. त्यानेंच संभाजीस शाहूराजांकडे राज्याचा हिस्सा मागण्यास चिथविलें होतें. त्यानें १७३९ सालीं संभाजीचा पक्ष घेऊन बीडकडे धुमाकूळ घातला. हा १७५१ सालीं मरण पावला.
रामचंद्र जाधव:- हा चंद्रसेनाचा मुलगा. इ. स. १५५६ त हैद्राबादचा नबाब सलाबतजंग यानें रामचंद्र जाधव व रावरंभा निंबाळकर यांनां बुशीच्या पाठलागार्थ त्याच्या मागोमाग पाठविलें होतें परंतु बुशी आपलें फारसें नुकसान न होऊं देतां हैद्राबादेस जाऊन पोंचला. यानंतर बुशीनें याला आपल्याकडे वळवून घेतल्यामुळें यानें मच्छलीपट्टणाहून बुशीच्या मदतीस हैद्राबादेस जी कुमक येत होती तिला मुळींच अडथळा केला नाहीं.
स. १७५६ च्या अखेरीस बुशी आपल्या पूर्वकिनार्यावरील जहागिरीकडे निघून गेल्यावर, बुशीकडे जी कुमक आली होती, तिला अडविण्याच्या कामीं रामचंद्र जाधवानें जी हयगय केली, तिजबद्दल त्याचें पारिपत्य करण्यासाठीं, सलाबत जंगानें त्याजवर स्वारी करून, त्याची बहुतेक जहागीर त्याजकडून काढून घेतली. बाह्यत: मात्र, रामचंद्र जाधवानें कराराप्रमाणें चाकरीस ठेवावयास पाहिजे तेवढी फौज ठेविली नाहीं, असें या स्वारीचें कारण दाखविण्यांत आलें होतें. उदागीरच्या लढाईंत हा निजामाकडेच होता. स. १७६१ मध्यें निजामअल्लीनें गोदावरीतीरीं असलेल्या कायगांव टोकें नांवाच्या गांवातील हिंदु देवळें उध्वस्त केल्यावरून, रामचंद्र जाधव मोंगलांनां सोडून मराठयांच्या पक्षास मिळाला.
इ. स. १७६२ त राघोबादादानें याला सेनापतीचीं वस्त्रें दिलीं. परंतु सेनापति या नात्यानें गुजराथप्रांतहि आपल्या ताब्यांत देण्यांत येईल अशी जी यास आशा होती, ती सफळ न झाल्यानें हा लवकरच पुढें पुन्हां निजामअल्लींकडे गेला. रामचंद्र हा स. १७६९ त निजामकडून मारला गेला. त्याचा पुत्र खाशेराव ह्यास भालकीची जहागीर मिळाली होती.
ही माहिती जाधव वंशविस्तार मधून घेतली आहे.
धनाजी जाधव हे जिजाबाईंचे जवळचे नातलग.सख्ख्या भाऊ अचलोजीचा नअचलोजी चा मुलगा संताजी जो कानाकगिरीच्या युद्धात मारला गेला.त्या संताजी चा मुलगा शंभूसिंग आणि शंभूसिंग चा मुलगा म्हणजे धनाजी.
दौलाताबदे निजाम च्या सुलताना च्या दर्शनाला लखुजी जाधवराव त्यांच्या तीन मुला सह म्हणजे अचलोजी, राघोजी आणि यशवंतरावगेले., हे तिघे सुलताना समोर उभे होते. मुजरे झाले व सुलतान भर दरबार मधून उठून निघून गेला आधीच कट ठरला होता तलवारी उपसल्या गेल्या . काहीच अर्थ , प्रतिकार करण्याची पूर्ण संधि सुद्धा लाभली नाही आणि सुलतानी दरबार चार जाधवांच्या इमानदार रक्ताने धुवून निघाला होता.आई जवळ राहिलेला बहद्दुर्जी तेवढा वाचला होता .शहाजी महाराजांनी मात्र निझाम वर चिडून निजामशाही सोडली धानाजी जाधव यांच्या जन्म स. १६५० च्या सुमारास झाला. हा प्रथम प्रतापराव गुजराच्या हाताखालीं होता. उंबराणीच्या लढाईत तो प्रथम पुढें आला. पुढें १६७४ मध्ये धनाजी हा हंबीरराव मोहिते याच्या हाताखालीं गेला. विजापूरचा सेनापति अबदुलकरमि याशीं झालेल्या नेसरीच्या लढाईत यानें विशेष शौर्य दाखविल्यामुळें यास बढती देण्यांत आली .सावनूरच्या लढाईंत यानें हुसेनखान मायणा याचा पुरा मोड केला तेव्हां शिवाजीनें याची तारीफ केली संभाजी महाराजांचे वध झाल्यावर संताजी धनाजी ने पुढे शौर्याने महाराष्ट्र गाजवला .संताजीच खून झाल्यावर धनाजी सेनापती झाला आणि त्यांनी तुळापूर च्या औरंगझेब छावणी वर हल्ला करून सोन्याचे कळस कापले त्याबरोबर विठोजी चव्हाण पण होते . नंतर सिंहगड कडे सिधोजी गुजर कडे निघून गेले. परत झुल्फीकारच्या सैन्यावर हल्ला करून पाच हत्ती पळवले. १६९० मध्ये जुल्फिकारखानाने जिंजीला वेढा दिला. हा वेढा सात वर्षे चालू होता. संताजी-धनाजी यांनी या वेढ्यात मोगली अधिकाऱ्यांना जेरीस आणले होते. १६९६ मध्ये संताजी-धनाजी मधील भांडणे विकोपाला गेली. राजारामांनी संताजीचे सेनापतिपद काढून धनाजीला दिले६९८-९९ मध्ये राजारामांनी खंडेराव दाभाडे, परसोजी भोसले, धनाजी जाधव यांच्याबरोबर वऱ्हाड-खानदेशांत स्वारी केली होती.धनाजी ने 40000 फौज घेऊन १७०५ मध्ये गुजरात मध्ये धडक मारून मुघल सैन्याला सळो कि पालो सोडले . रतनपूर ची लढाई तर विशेष करून गाजली त्यात अनेक मुघली सरदार मारले गेले. यानंतर मोंगलांच्या छावणींतून शाहूची सुटका होऊन तो महाराष्ट्रांत आला, तेव्हां ताराबाईकडून धनाजी जाधवाची त्याच्यावर रवानगी झाली होती. परंतु धनाजीनें शाहू हा तोतया नसून खरा आहे असें ओळखून तो त्याला मिळाला. पुढें शाहू गादीवर बसला तेव्हां त्यानें धनाजीस सेनापतीच्या जागीं कायम नेलें, . धनाजी हा अखेरपर्यंत कोल्हापूरच्या विरुद्ध शाहूकडेच राहिला
मे १७१० धनाजी हा कोल्हापूरकरावरील रांगण्याच्या मोहिमेवरून परत येत असतां वारणा नदीच्या कांठीं वडगांव येथें मरण पावला.
वडगांव ची धनाजी जाधव ची समाधी
धनाजीचा ला दोन बायका, पहिली बायको ही सती गेली..पहिल्या बायकोला मुलगा त्याचा नाव संताजी. आणि पतंगराव (चंदन वंदन च्या युद्धात मारला गेला) अशी आख्यायिका (?)आहे की संताजी घोरपडे चा विशेष प्रभाव किंवा मैत्रिपोटी त्याने पहिल्या मुलाचे नाव संताजी जाधव ठेवला.संताजी घोरपडे चा पण त्यावर विशेष जीव होता पण एक युद्धात संताजी जाधव हा सातारा जवळ मांडावे इथे मारला गेला.दुसरा बायकोपासून धनजीला ला दोन मुले त्यात मोठा मुलगा चंद्रसेन जाधव आणि धाकटा शंभूसिंग.
धनाजीचा प्रथम पुत्र संताजी जाधव ची समाधी, मांडावे सातारा
धनाजी आजारी असतांना बाळाजी विश्वनाथ हा त्याचा कुल कारभार पाहूं लागला, पण शाहू महाराजांच्या वाढत ओढ पाहून चांद्रसेनच्या मनात मत्सर उत्पन्न झाला. वास्तविक चंद्रसेनाचा ओढा ताराबाईकडे होता व तो आंतून तिला (शाहूच्या विरुद्ध) फितूरहि झाला होता.
धनाजीच्या मरणानंतर चंद्रसेनाकडे सेनापतित्व आलें. इ. स. १७१३ मध्यें मोगलाईंतून चौथ, सरदेशमुखी वसूल करण्याकरितां चंद्रसेनाची योजना झाली होती. या प्रसंगीं वरील हक्कांपैकीं सरदेशमुखी गोळा करण्याकरितां चंद्रसेनाबरोबर बाळाजी विश्वनाथाची नेमणूक झाली असल्यामुळें बाळाजीविषयीं चंद्रसेनाचा द्वेषाग्नि अधिकच भडकला. त्यानें क्षुल्लक कारणावरून (हरणाचा तंटा) कुरापत काढून बाळाजीचा पाठलाग केला व (शाहूच्या आज्ञेवरून) त्यास पांडवगडामघ्घें आश्रय मिळाला असतां चंद्रसेनानें त्या किल्ल्यास वेढा दिला, व बाळाजीस आपल्या हवालीं करण्याविषयीं शाहूजवळ उर्मटपणानें मागणी केली. शाहूनें हैबतराव निंबाळकरास जाधवाचें वचपा करण्यास पाठविलें. निंबाळकरानें जेऊरजवळ चंद्रसेनाचा पराभव केला; तेव्हां तो उघडपणें कोल्हापूरकर संभाजीकडे गेला; परंतु पुढें लवकरच दक्षिणेंत निजाम आल्यावर त्यानें निजामाच्या पदरीं चाकरी धरली व शाहूचा पाडाव करण्याची खटपट चालविली. बिदर भालकी येथें बरीच मोठी जहागीर निजामानें जाधवास देऊन त्यास आपल्या पदरीं ठेविलें. १७१६ मध्यें सय्यदबंधु याचा दिवाण महकबसिंग व खंडेराव दाभाडे यांच्या दरम्यान अहमदनगराजवळ जी लढाई झाली तींत चंद्रसेन मोंगलांकडून लढत होता. बाळापुरच्या लढाईंतहि चंद्रसेन निजामाकडून लढला. स. १७२५ त तर चंद्रसेनानेंच निजामास शाहूविरुद्ध उठविलें होतें.
इ. स. १७२७-२८ मध्यें निजाम व बाजीराव यांच्यामध्यें जें युद्ध झालें, त्यांत चंद्रसेन निजाम काढून लढत होता. त्यानेंच संभाजीस शाहूकडे राज्याचा हिस्सा मागण्यास चिथविलें होतें. हा १७५१ सालीं मरण पावला.चंद्रसेनाचा मुलगा रामचंद्र जाधव.हाही काही दिवस निजाम कडे राहिला पेशवेचा प्रसिद्ध उदगीर लढाईंत हा निजामाकडेच होता. स. १७६१ मध्यें निजामअल्लीनें गोदावरीतीरीं असलेल्या कायगांव टोकें नांवाच्या गांवातील हिंदु देवळें उध्वस्त केल्यावरून, रामचंद्र जाधव मोंगलांनां सोडून मराठयांच्या पक्षास मिळाला.
इ. स. १७६२ पानिपत नंतर राघोबादादानें याला मराठ्यांकडे बोलावले. परंतु स गुजराथप्रांतहि आपल्या ताब्यांत देण्यांत येईल अशी जी यास आशा होती, ती सफळ न झाल्यानें हा लवकरच पुढें पुन्हां निजामकडे गेला. रामचंद्र हा स. १७६९ त निजामकडून मारला गेला. त्याचा पुत्र खाशेराव ह्यास भालकीची जहागीर मिळाली होती. तो टिप्पूबरोबरच्या एका लढाईंत ठार झाल्यावर (१७९१) त्याची जहागीर खालसा झाली.
Source:
१)शिवदे यांचे पुस्तक
.२)जाधवांची कैफियत;
३)डफ,
४)जदुनाथ सरकार चे काही भाग
५)image :Google
धनाजी जाधव यांना पहिल्या पत्नी पासून दोन मुले होती.
त्यातील पतंगराव जाधव हे चंदन वंदन च्या लढाई मध्ये मारले गेले होते. त्यांची समाधी हि वाई तालुक्यात किकली गावाच्या हद्दीमध्ये एका शेतात आहे.
तर दुसरे मुलाची मांडवे बोरगाव हि शाखा.
सध्या बोरगाव मध्ये कोणीही वंशज नाही , कारण ते माळेगाव येथे दत्तक घेतले गेले.
संताजी आणि धनाजी यांचा मृत्यू कसा झाला? याची माहिती मिळेल का?
🏷संताजी घोरपडे (मृत्यू : १८ जून, इ.स. १६९७) हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते.
नागोजी माने याने संताजी घोरपडेंना बेसावध असताना मारल्याची नोंद इतिहासात आहे. कुरुंदवाड येथे प्रयागतीर्थ म्हणून ओळखले जाणाऱ्या पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर एक सुब्रह्मण्येश्वर महादेवाचे मंदिर बांधले आहे. मंदिरासमोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. कुरुंदवाड संस्थानाधिपती श्रीमंत रघुनाथ दादासाहेब पटवर्धन यांनी मंदिराशेजारी नदीवर १७९५ साली एक घाट बांधला आहे
🏷धनाजी जाधव (इ.स. १६५० - २७ जून, १७०८) हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते.
धनाजी हे कोल्हापूरकरावरील रांगण्याच्या मोहिमेवरून परत येत असतां वारणा नदीच्या कांठीं पेठवडगांव येथें मरण पावले (मे १७१०). त्यांना कित्येक दिवसांपूर्वीं झालेली एक जखम पुन्हां वाहूं लागल्यामुळें तो बरेच दिवसपर्यंत आजारी होते. त्यांची समाधी पेठवडगाव येथे आहे.
कुरुंदवाड व पेठवडगाव च्या जवळचे मोठे ठिकाण, जिल्ला वगेरे कळवावा जेणे करुन जाण्यास योग आला तर समाधिस्थळां चे दर्शन घेता येइल.
संताजीं चा मराठे माने यांनी घात केला हे जाणून वाइट वाटते. महाराष्ट्रात स्वकिंयाच्या घाता चा मोठा इतिहास वाचण्यात येतो आणी तरीही इतिहासाच्या नावा खाली मराठा - ब्राम्हण - दलित - आंबेडकरवादी असे फुटिरतावादी गट उभे होतायत व मराठी जनतेत आपसात तेढ निर्माण करतायत त्यांना ओळखून परास्त करणे गरजेचे आहे. कधी राम गणेश गडकरींचा, कधी दादोजी कोंडदेवां चा पुतळा फोडला जातोय, कधी शिवरायांच्या श्वाना चा पुतळा फोडला जातोय, कधी भीमा कोरेगाँव मधे तेढ निर्माण केली जाते. हा शुध्ध मुर्खपणा आहे. या सर्वा मागची कट कारस्थाने उघडी पाडायला हवीत. त्यांचे बळी पडणे समाजा साठी श्रेयस्कर नाही. निधर्मीवादी, फालतु सेक्युलर लोकं व हरामखोर राजकारणी या 'फोडा ' व ' तोडा ' नीती मागे आहेत हे सामान्य जनतेने ओळखणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment