Posts

Showing posts from August, 2020

महार

महार-  एक हिंदु जात. 👉 या जातीचे लोक महाराष्ट्र, कोंकण, नागपूर, वर्धा, भंडारा, चांदा इत्यादि ठिकाणीं आढळतात. 👉 १९११ सालीं या जातीची संख्या सुमारें ३३ लाख होती. 👉आर्य लोकांनीं हिंदुस्थान जिंकण्यापूर्वी या देशांत ज्या मूळ जाती होत्या त्यांपैकी या महारांची जात असावी असें एक मत आहे. 👉 राजारामशास्त्रीं भागवतानीं हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असें मत दिलें आहे, तथापि द्राविडी शाखेच्या लोकांच्या चेहरेपट्टीमध्यें व यांच्या चेहरेपट्टीमध्यें साम्य आढळून येत नाहीं. 👉कांहींच्या मतें राजस्थानांतील मेहेर व महाराष्ट्रांतील महार यांचे पूर्वज एकच असावेत. 👉 महाराष्ट्र हें नांव ' महारांचें राष्ट्र ' यांवरून पडलें असेंहि कांही मानतात.  👉डॉ. भांडारकरांच्य मतें मेलेल्या जनावरांनां वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. 👉 इतिहाससंशोधक राजवाडे हे आधींच्या शूद्र जातीपासून चांडाळादि जातींची उत्पत्ति झाली असें म्हणतात .  👉आधींचे महा + अरि म्हणजे मोठे शत्रु ते महार अशीहि कांहीं विद्वानांनी उपपत्ति लावली आहे.  👉महारांचे स्थलपरत्वें अनेक पोटभेद झाले आहेत; त्यांपैकी सोमवंशीय , ला...

महाजन

महाजन-  ही ''ग्रामणी'' ची पदवी आहे, पण काश्मीर पंजाबकडे जात झाली आहे. काश्मिरी महाजनांची लोकसंख्या २० हजार असून वृत्ति कायस्थांप्रमाणें आहे. काश्मिरांत फारसे कायस्थ नाहींत. अनेक ठिकाणीं खालच्या जातींतल्या स्वतःस शिष्ट समजणारे लोक (उदाहरणार्थ, कलाल इत्यादि) आपणांस महाजन म्हणवून निराळी जात स्थापन करीत आहेत.

बाजार-बुणगे आणि सदाशिवराव भाऊ

Image
बाजार-बुणगे आणि सदाशिवराव भाऊ सदाशिवराव भाऊवरचा सर्वच इतिहासकारांनी (संजय क्षीरसागर वगळता) नि कादंबरीकारांनी केलेला गंभीर आरोप म्हणजे बाजार-बुणगे आणि यात्रेकरुंचे अंगावर लादुन घेतलेले ओझे. केवळ यामुळे मंदावलेली सैन्याची वाटचाल. पानिपती त्यांच्या सुरक्षेसाठी अडकुन पडण्याची नामुष्की व त्यातुनच ओढवलेली उपासमारी. म्हणून पानिपतच्या पराजयाचे हेही एक कारण. दीर्घकालीन व लांब अंतराची युद्धे बाजार-बुणग्यांशिवाय मुळात होऊच शकत नाही. त्यासाठी आधी बाजार-बुणगे म्हणजे नेमके काय हे समजावून घ्यायला पाहिजे. बाजार म्हणजे: सैन्याला लागणारे खाद्यपदार्थ, कपडे, वस्तू, धान्य वगैरे विकणारा वर्ग. बुणगे म्हणजे: बिगरलढवैय्ये पण सैन्यास सेवा पुरवण्यासाठे आवश्यक असलेला वर्ग. सैन्याला अनेक सेवा लागतात. १) सैनिकांचे हिशोब ठेवणारे कारकुन. २) तंबू, तोफा, दारुगोळा, अन्न-धान्य वाहून नेणारे गाडीवान. ३) तलवारी-ढाली यांची मरम्मत व अन्य कामांसाठी लागणारे लोहार/सुतार/पाणके-पखालवाले/शिंपी वगैरे. ४) तंबु उभारणारे/खंदक खोदणारे. ५) घोड्यांचा खरारा करणे, पाणी दाखवणे इ. सेवा करणारे. ६) वैदू, ७) करमणुकीसाठी शाहीर, तमासगीर वगैरे. ८) ...

ढोर समाजाचा इतिहास

ढोर समाज: ढोर समाजाचा इतिहास ढोर हा भारतातील... - वीरशैव कक्कय्या ढोर समाज ♨️ढोर समाज: ♨️ढोर समाजाचा इतिहास 👉ढोर हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे.  👉हा समाज प्रामुख्याने महाराष्ट, कर्नाटक व अल्पांश स्वरुपात गुजरातेत आढळतो.  👉अन्यत्र कातडी कमावणा-या समाजांना वेगवेगळी नांवे आहेत.  👉जशी उत्तरेत मोची, चमार वगैरे. 👉 ज्या ज्या भागांवर सातवाहनांनी राज्य केले तेथे तेथे माहाराष्ट्री प्राक्रुत भाषेचा प्रभाव असल्याने त्या भागांतील जातींची नांवे ही माहाराष्ट्री प्राक्रुतावरुन पडलेली आहेत.  👉त्यामुळे येथील जातीनाम वैशिष्ट्येही वेगळी आहेत, हे आपण अन्य जातीनामांवरुनही पाहु शकतो.  👉अन्यत्रच्या जातीनामांवर त्या-त्या प्रदेशातील भाषांचा प्रभाव असला तरी हा समाज मुळचा तसा एकच.  👉चर्मकार समाजही याच समाजातुन विशिष्ट कौशल्यांमुळे वेगळा झाला एवढेच! नामोत्पत्ती : "ढोर" हा शब्द मुळात जनावरांसाठीचा नाही व अवमानास्पदही नाही हे माहाराष्ट्री प्राक्रुतावरुन स्पष्ट दिसुन येते .  👉मुळ शब्द " डहर " असा असुन त्याचा अर्थ पाणवठे , डोह , तळी यानजीक व्यवसाय करणारे लोक असा आहे....

सुशिलकुमार शिंदे म्हणतात, युवकांनो इंटरकास्ट मॅरेज करा

Image
सुशिलकुमार शिंदे म्हणतात, युवकांनो इंटरकास्ट मॅरेज करा By admin on Fri, July 01, 2016 8:59pm महात्मा बसवेश्वर हे इंटरकास्ट मॅरेजचे प्रणेते आहेत़. बाराव्या शतकात त्यांनी वीरशैव कक्कय्याचा विवाह एका ब्राम्हणयुवतींशी करून दिला होता़. त्यामुळे युवकांनो इंटरकास्ट मॅरेज     Open in App सोलापूर : महात्मा बसवेश्वर हे इंटरकास्ट मॅरेजचे प्रणेते आहेत़. बाराव्या शतकात त्यांनी वीरशैव कक्कय्याचा विवाह एका ब्राम्हणयुवतींशी करून दिला होता़. त्यामुळे युवकांनो इंटरकास्ट मॅरेज करा, मुलींचा शोध घ्या, पण जीवनभर साथ देणारी असावी़, माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे हे उदगार दाद घेऊन गेले़.  सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ़ इरेश स्वामी यांच्या बसवबोध या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले़. त्यावेळी ते बोलत होते़ पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिला़. जातीभेद दूर करून समाजात क्रांती घडवून आणली़. त्यातून त्यांनी आंतरजातीय विवाहांनाही प्रोत्साहान दिले़. यावेळी शिंदे यांनी स्वत:च्या विवाहाचा किस्...

दलित स्त्रीच्या आत्मभानाची वाटचाल

Image
  दलित स्त्रीच्या आत्मभानाची वाटचाल जमिनीखाली दडलेला लाव्हा जसा जमीन फोडून वर उसळी मारतो, झियाऊद्दीन सय्यद  and  झियाऊद्दीन सय्यद  |डॉ. अश्विनी धोंगडे | Updated: September 24, 2015 4:35 am Ad महत्त्वाच्या बातम्या संदेश समानतेचा – ब्राह्मण पुजाऱ्यानं खांद्यावरुन वाहिलं दलित भक्ताला पीक कापणीस नकार देणाऱ्या दलिताला मूत्रप्राशनाची अघोरी शिक्षा दलितांच्या कल्याणासाठी व सुरक्षेसाठी मोदी सरकार कटिबद्ध – खासदार अमर साबळे सामाजिक इतिहासात उतरंडीच्या तळागाळाशी असलेली दलित स्त्री अज्ञान, दारिद्रय़, अत्याचार, अंधश्रद्धा यांनी पिचलेली होती तरीही ती दुबळी, हातपाय गाळून बसणारी कधीच नव्हती. सतत कष्ट करणारी, अन्याय-अत्याचाराला खंबीरपणे तोंड देणारी आणि प्रतिकूल परिस्थितीत तगून राहणारी अशी जात्याच होती. जमिनीखाली दडलेला लाव्हा जसा जमीन फोडून वर उसळी मारतो, तशा पिढय़ान्पिढय़ा दडपल्या गेलेल्या व्यक्तीही कधी ना कधी आपल्या अस्मितेचा आविष्कार दाखवतातच. ही दडपणूक जितकी जास्त तितका हा आविष्कार अधिक प्रभावशाली असतो. दलित स्त्रियांच्या लढय़ाचा मागोवा घेताना ही वास्तवता प्रकर्षांने लक्षात येते. साम...

महार कोण होते?

Image
पुस्तक परिचय : महार कोण होते? Submitted by  सागर  on बुधवार, 11/04/2012 - 00:56 माणूस म्हणून जगण्याचे आत्मभान देणारे पुस्तक : महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप लेखक - श्री. संजय सोनवणी किंमत : १०० रु. प्रकाशक : पुष्प प्रकाशन एवढ्यांतच "महार कोण होते?" हे सुप्रसिद्ध लेखक आणि संशोधक "श्री.संजय सोनवणी" यांनी लिहिलेले पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण केले. महार समाजाचा इतिहास सांगणारे पुस्तक असे या पुस्तकाकडे कोणी पाहिले तर तो या पुस्तकावर मोठा अन्याय होईल. महार समाजाचा उगम घेता घेता लेखक श्री. संजय सोनवणी यांनी प्रत्यक्ष मानव संस्कृती कशी अस्तित्त्वात आली? जन्मावर आधारित जातीय व्यवस्था कशी अस्तित्त्वात आली? त्यातून शूद्र म्हणून हिणवले गेलेल्यांवर अमानवीय अत्याचार कसे झाले? कर्मकांडांच्या अवडंबरातून सत्ता केंद्रीत करुन बहुजनांचे शोषण कसे झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यांच्या आधारे व अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने या पुस्तकातून दिलेली आहेत. म्हणूनच हा ग्रंथ केवळ महार समाजाचा न राहता त्याहीपलिकडे जाऊन अखिल मानव समाजाचा होतो. केवळ १०९ पानांच्या या अफाट आवाका असलेल्या पु...