Posts

Showing posts from July, 2020

धाकल्या धन्याचा

भिमाकोरेगावा पासुन ७की.मी वर "वढु" गाव आहे....... येथेच "छ.संभाजी महाराज" यांचा खुन झाला व त्यांचे तुकडे ह्या गावात फेकण्यात आले व सांगितले कि जर कोणी हे गोळा केले तर त्याचे "शीर" कलम केले जाईल...... आपल्या राजाची अशी दशा पाहुन एकही """मराठा"""" पुढे आला नाही. पण एका ""पहिलवानाला"" 'ही बातमी समजली तो धाडस करतो सर्व "तुकडे" जमा करुन स्वत:च्या घरी आणुन "शिंपीला" हातपाय पडुन तैयार करतो आपला राजा आहे त्यास असे नाही सोडू शकत..... तो शिंपी ते तुकडे शिवतो पहिलवानाच धाडस पाहुन त्याचे "नातलग" ही मदतीला येतात असे ६२ जन जमा होतात.... आणि त्या पहिलवानाच्या "अंगणात" "छ.संभाजी राजेंना अग्नि डाग स्वत: तो पहिलवान देतो....." त्या पहिलवानाचे नाव होते """गणपत महार"""" ""जय भिमवाला"""" '''होय एका महाराने छ.संभाजी राजेंना ...

वीरयोद्धा : शिदनाक महार

Image
शिदनाक महार शिदनाक महार(१६९७-१७०८) हे साताऱ्याजवळील कळंबी गावचे वतनदार. औरंगजेबच्या हातून संभाजी राजांची हत्या करण्यात आली तेंव्हा महाराष्ट्रभर जी बंडाळी माजली त्यात शिदनाक महार यांनी पलटन जमवून मुघलांविरुद्ध मोठीच धामधुम काही काळ केली. शाहू महाराज कैदेतून सुटुन पुन्हा राज्यात आले तेंव्हा यांची निष्ठा शाहू राजांना सामिल झाली. यात शाहू महाराजांनी यांना कळंबी गाव इनाम दिला. १७९५-१८१८ या काळात यांचा नातू शिदनाक होऊन गेला. तो खर्ड्याच्या लढाईत होता. छावणित याच्या तंबू भोवती ब्राम्हण, सरदार यांचे तंबू होते. त्यांनी विनंती केली केली की महाराचा तंबू दूर करावा. सरदार पाटणकरांनी परस्पर उत्तर दिले की, ही जेवणाची पंगत नाही. ही शुर-विरंची पंगत आहे. यात जातिपातीचा विचार नाही. महाराचा तंबू हलवण्याची गरज नाही. निकराच्या हल्ल्याच्या दिवशी महाराने पेशव्यास हात जोडून विनंती केली की मी महार आहे म्हणून सारे माझा तिरस्कार करतात, आज मी काय कामगिरी करतो ती उघड्या डोळ्यांनी पहावि. त्या लढाईत त्याने तलवार गाजवली. पटवर्धन मंडळी खुश झाली. इनाम दिले. पेशवाई बुडाल्यावर हां बराच वर्षे होता. चिंतामणराव पटवर्धन आजारी...

महाराच्या गळ्यात मडके का आले?

Image
               (---------चंद्रा महार--------) महारांच्या गळ्यात थुंकण्यासाठी मडकं आणि कमरेला झाडू कसा आला ? का असे घडले? खरच महार समाज ईतका घाणेरडा होता.का?" महार समाजाचा इतिहास हा शौर्यांचा इतिहास आहे.त्यांच्याइतके साफ - स्वच्छ,प्रगत कुणीच नव्हते..मग गळ्यात मडके आणि कमरेला झाडू अचानक कसे आले.? एकदा रघुनाथ पेशव्याची पत्नी आनंदाबाई पेशवे आपल्या दासींसोबत फिरायला निघाली.अगोदरच पेशवे घराणे स्त्री लंपट आणि पुरुष लंपट होते.अचानक आनंदाबाई ला मातीवर एका पुरुषाच्या पावूल खुना दिसल्या.त्या पाउल खुणा सर्व सामान्य माणसापेक्षा मोठ्या आणि आकर्षक होत्या. ती त्या पाऊल खुनावरच ती भाळली.तिने त्या पाउल खुना कुनाच्या आहेत याचा शोध घ्यायला लावले.शोधातून समोर आले की त्या पाउल खुना चंद्रा नावाच्या महार लोहाराच्या होत्या.  त्यावेळेस महार समाज राजांचे शस्त्र बनविन्याचे आणि युद्धात लढाई करण्यात शौर्यवान होते. जेव्हा आनंदाबाई त्याला पहायला गेली तेव्हा तो तलवार बनविण्याचे काम करत होता.त्यामुळे सहाजिकच त्याच्या कामामूळे त्याचे शरीर पिळदार झाले होते.उष्णतेमुळे अंगावर अगो...

महार समाज : महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी

महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. श्री. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र याचा अर्थ "महारांची भूमी" असा होतो.                               इतिहास महार हा गावाचा हरकाम्या. तो ओरडून दवंडी देई. प्रेताचे सरण वाही. जागल्या म्हणजे पहारेकरी. हा बहुधा महार जातीचा.  गावराखण करणाऱ्या महाराला चारी सीमा बारकाईने माहीत. म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची.  वेसकर या महाराने वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे.  महार या जातीचे लोक महाराष्ट्रात कोकण, नागपूर, वर्धा, भंडारा, चांदा इत्यादी ठिकाणी आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती.  आर्य लोक [[भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मो...

१.महार

Image
महार समाज बारा बलुतेदारपैकीच एक होता सुतार लोहार चांभार महार मांग कुंभार न्हावी धोबी गुरव जोशी भाट मुलानी हे बारा बलुतेदार होते सोनार जंगम शिंपी कोळी तराठ/येसकर माळी/बागवान डवरी गोसावी घडसी रामोशी तेली तांबोळी गोंधळी हे बारा अलुतेदार होते लिस्ट चा संदर्भ :- History of Marathas - Grant Duff छत्रपती च्या सेनेमध्ये जातीप्रथा नव्हती सर्व लोक स्वराज्यासाठी आपल्या परीने मदत करत होते.महार लोकांना महाराजांनी गडांच्या बाहेर गडांची सुरक्षा करणे शत्रूची माहिती गडावर पोहचवणे छुपे मार्ग तयार करणे आणि त्यांची काळजी घेणे अशी कामे सोपवली होती. ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• महार  (तत्सम जाती:  मेहरा ,  मेहर ,  महारा ,  तरल ,  तराळ ,  धेगुमेग ) हा  भारतातील   अनुसूचित जातीचा  समाज आहे, जो प्रमुख्याने महाराष्ट्रात राहतो.  हिंदू वर्णव्यवस्थेत  या जातीला  अस्पृश्य  ( दलित ) मानले गेले होते. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे.  महाराष्ट्राच्या  लोकसंख्येत ११% ते ...