Posts

पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का ?

आत्मपरीक्षण JUL 20 *पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का?* *वास्तविक पाहता पंढरपूरचा विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ, विठाई इत्यादि नांव असणारा हा पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का?*  *कारण विठ्ठल जर देव असता तर विठ्ठलाचा उल्लेख वैदिक ब्राम्हणाच्या धर्मसूत्रात म्हणजे रुग्वेद - यजुर्वेद - सामवेद व अथर्ववेदात असता पंरतु यात उल्लेख नाही. स्मृती - श्रृती, वेद पुराण, - उपनिषद - अरण्यक- मनूस्मृती या तमाम ब्राम्हणी वैदिक धर्म ग्रंथात विठ्ठलाचे नाव नाही* *तसेच विठ्ठल हे नांव रामायणात नाही. विठ्ठल महाभारतात नाही. विठ्ठल साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या गीतेत ही नाही म्हणजे वैदिक धर्माचे स्वरूप जानणाऱ्या वेदांच्या सर्वश्रेष्ठ ब्राम्हणी ग्रंथात जर विठ्ठलाचे कोठे ही नांव नाही* *तर ह्या सर्व पुराव्या वरुन हेच सिद्ध होते की पंढरपूरचा विठ्ठल हा देव नसून तो एक महामानव आहे* *विठ्ठलाच्या मूर्तीकडे नीट पाहिलेत तर काही गोष्टी लक्षात येतात कि, विठ्ठलाचे डोळे, त्याचे खांद्यावर रुळणारे लांब कान आणि कपाळ विशाल आहे. इतर वैदिक देव-देवता सारखे विठ्ठलाने हातात कोणतेही हिंसा करनारे शस्त्रे नाहीत, आयुधे धरलेले नाही की कोणतेही ...

जिजाऊ मासाहेब

आत्मपरीक्षण जिजाऊ मासाहेब जिजाऊंचे माहेरचे आडनाव जाधव. या गावात जाधवांचा प्रचंड भरणा आहे. ते कित्येक शतकांपासून या गावचे मूळ रहवासी आहेत. जिकडॆ तिकडे जाधवच जाधव. तुम्ही म्हणाला यात काय नवल. जिजाऊंच आडनाव जाधव होतं. लखुजी जाधवांचं हे गाव. मग ईथे जाधव नसणार तर काय पठाण असणार व्हय? अगदी, तुमचं मत पटलं. पण खरी गंमत पुढे आहे. सिंदखेडराजाचे जाधव हे मराठा नसून सगळेच्या सगळे जाधव बौद्ध (महार) आहेत, एक दोन अपवाद असतीलही.  म्हणजे कुठेतरी काहितरी मुरतय? ते नेमकं काय मुरतय हे मात्र सिद्ध करता येणे जरा अवघडच. बरच काही इतिहासाच्या पानांत गुदमरुन गेलं पण तरी हे दोन पुरावे उपलब्ध इतिहासाच्या विरुद्ध जाणारे आहेत. दडलेल्या इतिहासाला खोदण्यासाठी खुणावत आहेत. जिजाऊंचा वाडा महारवाड्या लगत असणे हा निव्वड योगायोग असूच शकत नाही. अन शिंदखेडचे सगळेच्या सगळे जाधव बौद्ध असणे हा सुद्धा योगायोग नाही. उपलब्ध इतिहास काहिही सांगू द्या, माझा त्यावर विश्वास नाही. वरील दोन जिवंत पुरावे पाहता जिजाऊ माझ्या आहेत असे आतून वाटते. कोणी स्विकारो वा नास्विकारो... जिजाऊ ह्या माझ्या पुर्वज आहेत व त्यांच्या बद्दल मला नितांत आदर...

धनाजी जाधव आणि त्याचा वंश

Image
धनाजी जाधव आणि त्याचा वंश:-   लुखजी जाधव याचा पुत्र जो अचलोजी त्यास निजामशहा यानें ठार मारल्यावर त्याचा मुलगा संताजी याचें संगोपन जिजाबाईनें केलें. कनकगिरीच्या लढाईत हा मेला. त्याला शंभुसिंग म्हणून पुत्र होता. त्याचा मुलगा धनाजी. याचा जन्म स. १६५० च्या सुमारास झाला. हा प्रथम प्रतापराव गुजराच्या हाताखालीं होता. उंबराणीच्या लढाईत तो प्रथम पुढें आला. पुढें (१६७४) धनाजी हा हंबीरराव मोहिते याच्या हाताखालीं गेला. विजापूरचा सेनापति अबदुलकरमि याशीं झालेल्या नेसरीच्या लढाईत यानें विशेष शौर्य दाखविल्यामुळें यास बढती देण्यांत आली (फेब्रु.) सावनूरच्या लढाईंत यानें हुसेनखान मायणा याचा पुरा मोड केला तेव्हां शिवाजीनें याची तारीफ केली (१६७९). संभाजीचा वध झाल्यावर आतां पुढें काय करावें हें ठरविण्याकरितां जी मुख्य मुख्य मराठे मंडळी रायगडावर जमली त्यांत धनाजी जाधव होता. त्यानें सातार्‍यास सर्जाखानाचा पराभव केला.       पुढें (१६९०) धनाजी राजारामाबरोबर जिंजीस गेला. तेथें त्यानें इस्मायलमकाचा पराभव केला, यावेळीं महादजी नाईक पानसंबळ याच्या मृत्यूचें वर्तमान समजल्यामुळें सं...

रट्ट घराणे

रट्ट घराणे रट्ट रट्ट कर्नाटकातील एक प्राचीन राजघराणे. या घराण्याचा रट्टगुडी किंवा रट्टगुड्लू असाही उल्लेख करतात. या घराण्याचा संस्थापक पृथ्वीराम. या घराण्याचा अंमल इ. स. ८५० ते १२५० दरम्यान कलदारि-बेळगावच्या परिसरातल्या कुंडी नामक प्रदेशावर होता. प्रथम त्यांची राजधानी सुगंधवर्ती (सौंदत्ती-बेळगाव जिल्हा) येथे असून नंतर वेळुग्राम (विद्यमान बेळगाव) येथे होती. प्रारंभी ते राष्ट्रकूटांचे मांडलिक (इ. स. ८७५–९७३) असून नंतर त्यांनी कल्याणीच्या चालुक्यांचे मांडलिकत्व (इ. स. ९७३–११७०) अंगीकारले. बाराव्या शतकाच्या अखेरीस ते स्वतंत्र झाले. रट्टांचा इतिहास प्रामुख्याने त्यांच्या कोरीव लेखांवरून ज्ञात होतो. हे कोरीव लेख बेळगाव जिल्ह्यातील वटनल, सोगळ, मुत्‌वाड, नेसर्गी, कलहोळे व खानापूर तसेच कोल्हापूर संस्थानातील रायबाग या ठिकाणी शेकडोंनी मिळाले आहेत; तथापि या घराण्याची संपूर्ण विश्वासनीय वंशावळ व राजांचे काल अद्यापि ज्ञात झालेले नाहीत. रट्ट राजे आपला उल्लेख महामंडलेश्वर या उपाधीने करीत असत. याशिवाय त्यांनी लट्टलुपूर्वारधीश्वर किंवा लट्टनूर-पूर्वारधीश्वर ही बिरुदेही धारण केली होती. काही राजे उदा., एर...

महार-महाराष्ट्र-मराठा

Image
महार-महाराष्ट्र-मराठा मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात इ.स. ३६५ मध्ये कोरलेल्या 'एरण' गावाच्या स्तंभलेखात श्रीधर्मवरम्याचा आरक्षिक व सेनापती सत्यनाग याने स्वतःला 'महाराष्ट्रीय' असे म्हटले आहे. हा स्तंभलेखातील महाराष्ट्राचा उल्लेख सर्वात प्राचीन ठरतो. सम्राट अशोकाच्या काळात तिसर्या बौद्ध धम्म परिषदेत ठरल्यानुसार बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी इ.स.पु. २४६ मध्ये महाधम्मरक्खीताला 'महारठ्ठ' देशात पाठवल्याचा उल्लेख महावंश व दिपवंश या बौद्ध ग्रंथात आढळतो. इ. स. ७ व्या शतकात चिनी यात्री युआनत्संग  हा भारतात आला होता. त्याने चालुक्य राजा पुलकेशी (दुसरा) च्या राज्यास भेट दिली होती. या चालुक्यांच्या राज्याला त्याने 'माहोलाच' म्हणजेच महाराष्ट्र असे म्हटले. ऐहोळी येथील (विजापूर जिल्हा मलप्रभा तीरी) जितेंद्र मंदिराच्या कोरीव लेखात पंडित राविकिर्तीकृत प्रशस्तीश्लोक दिले आहेत. त्यातील एका श्लोकात सत्याश्रय पुलकेशीने ९९ हजार गावे असणाऱ्या व महाराष्ट्रक नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीनही प्रदेशांचे अधिपत्य मिळविले अशी नोंद आहे. हा लेख इ.स. ७१२ मधील आहे. श्री. व्यं. केतकर यांच्या मत...