पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का ?

  1. *पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का?*

    *वास्तविक पाहता पंढरपूरचा विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ, विठाई इत्यादि नांव असणारा हा पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का?* 
    *कारण विठ्ठल जर देव असता तर विठ्ठलाचा उल्लेख वैदिक ब्राम्हणाच्या धर्मसूत्रात म्हणजे रुग्वेद - यजुर्वेद - सामवेद व अथर्ववेदात असता पंरतु यात उल्लेख नाही. स्मृती - श्रृती, वेद पुराण, - उपनिषद - अरण्यक- मनूस्मृती या तमाम ब्राम्हणी वैदिक धर्म ग्रंथात विठ्ठलाचे नाव नाही*
    *तसेच विठ्ठल हे नांव रामायणात नाही. विठ्ठल महाभारतात नाही. विठ्ठल साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या गीतेत ही नाही म्हणजे वैदिक धर्माचे स्वरूप जानणाऱ्या वेदांच्या सर्वश्रेष्ठ ब्राम्हणी ग्रंथात जर विठ्ठलाचे कोठे ही नांव नाही*
    *तर ह्या सर्व पुराव्या वरुन हेच सिद्ध होते की पंढरपूरचा विठ्ठल हा देव नसून तो एक महामानव आहे*

    *विठ्ठलाच्या मूर्तीकडे नीट पाहिलेत तर काही गोष्टी लक्षात येतात कि, विठ्ठलाचे डोळे, त्याचे खांद्यावर रुळणारे लांब कान आणि कपाळ विशाल आहे. इतर वैदिक देव-देवता सारखे विठ्ठलाने हातात कोणतेही हिंसा करनारे शस्त्रे नाहीत, आयुधे धरलेले नाही की कोणतेही हत्यार नाही, विठ्ठलाला चार हात नाहीत, तो आपले दोन कमलहस्त आपल्या कमरेवर ठेऊन उभा आहे तसे करून जणू तो जगाला आपल्या लेकरांना, उपासकांना म्हणजेच वारकऱ्यांना अहिंसेचा संदेश देत आहे अर्थात पंढरपूरचा विठ्ठल हा अहिंसेचा पुरस्कर्ता महामानव आहे देव नाही*

    *तसेच समतेने- ममतेने, बंधूभावाने, प्रेमाने, आपुलकीने वागवणारा असा पंढरीच्या विठ्ठला मध्ये कुठलाच भेदभाव नाही, उच्चनिचता नाही, गैरबराबरी नाही*
    *विठ्ठलाला होमहवन- अभिषेक करण्याची गरज लागत नाही, त्याला दक्षिणा वाहण्याची गरज नाही, त्याला भट-ब्राह्मणाची मध्येस्थही लागत नाही आणि त्याच्या पूजेसाठी मंत्र- तंत्र म्हणण्याची सुद्दा गरज नाही. फक्त मुखाने नामाचा गजर केला तरी चालतो. तो प्रसन्न हसतो आहे. विठ्ठलाची अहिंसक शांत मूर्तीच तो कोणी तरी महामानव असण्याचे प्रतिक आहे. अर्थात पंढरपूरचा विठ्ठल देव नाही*

    *संत नामदेव महाराज*
    ..........................
    *वारकरी संप्रदायाचे संस्थापक मानले जातात ते आपल्या वारकरी संत सहकार्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची ओळख करून देताना सांगतात.....*
    *"बौद्ध अवतारी आम्ही झालो संत |*
    *वर्णावया मात नामा म्हणे ||"* 
    *तुझा बुद्धावतार वर्णन करण्यासाठी म्हणजे बुद्धविचार लोकांना सांगण्यासाठी आणि बौद्धावतारात तु कशी वैदिकांवर मात केली होती ते वर्णन करण्यासाठी आम्ही संत झालो आहोत, अशा शब्दात नामदेव महाराज अवतारकार्य सांगतात*
    *पुढे जाऊन संत नामदेव महाराज विठ्ठला हा तथागत बुद्धच आहे असे आपल्या अभंगात सांगतात•••*
    *गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू |*
    *आपण योगेश्वरु बौद्ध रुपी ||*
    *व्रतभंगासाठी बौद्ध अवतार* |
    *झाला दिगंबर अवनिये |*
    *ऐसा कष्टी होऊनी बौद्ध राहिलासी* ||
    *"धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी |*
    *या लागी बौद्ध रूपे पंढरी नांदसी* ||"
    ..........

    *संत तुकाराम महाराज*
    ...........
    *बौध्यअवतार माझिया अदृष्टा ।मौन्य मुखें निष्ठा धरियेली ।।१।।*
    *आलें कलियुग माझिया संचिता । डोळां हाकलितां न पडेसी ।।२।।*
    *म्यांच तुझें काय केलें नारायणा । कां नये करुणा तुका म्हणे ।।३।।*
    *(अंभग2560)*
    *मौन धारण केलेला हा बौद्धअवतार माझ्या वाट्याला आला आहे. लोकांसाठी शाम चतुर्भुज झाला आहे. संतांशी गुजगोष्टी करत आहे. माझ्या भाग्यात हे कलियुग आलं आहे, तुझं रुप डोळ्यापुढून हाकललं तरी जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, "मीच तुझं असं काय घोडं मारलं आहे की तुला माझी कींव येत नाही?"*
    *संत तुकाराम महाराज म्हणतात बुद्ध अवतार मी पाहिलेला नाही. मुखाने मौन धरण्याची निष्ठा तू धारण केली पण प्रत्यक्षात आपल्याला बुद्ध पाहता आलेला नाही ही एक प्रकारची खंत व्यत्क केलेली आहे*.

    *बुद्धावतारात, बुद्ध सतत भ्रमण करत. नीती-अनिती, धर्म, समजून सांगत. लोकांना उपदेश करत. पण विठ्ठलाने मात्र मौन धारण केलं आहे. दोन्ही हात कटीवर ठेऊन तो उभा आहे. त्याचं मौन हे सामान्य लोकांसाठी आहे, मात्र तो संतांशी गुजगोष्टी करतो असं तुकाराम महाराज सांगतात*
    *"लोकांचियेसाठी शाम चतुर्भुज |*
    *संतांसवें गुज बोलतसां ||*
    *चतुर्भुज होणं म्हणजे बंधनात बांधलं जाणं. सामान्य लोकांसाठी विठ्ठल बंधनात बांधलेला आहे, पण संतांशी मात्र तो गुजगोष्टी करतो*
    .............

    *संत एकनाथ महाराज*
    ..............
    *बुद्धाला बोधाई माऊली म्हटलं आहे.*
    *बोधोनि सकळही लोका |*
    *बोधे नेले त्रिविध तापवो ||*
    *बौद्धरुपें नांदसी | बोलेविना बोलणे एक वो ||*
    *साधक बाधक जेथे एकपणेच बोधविसी वो |*
    *ऊदो म्हणो ऊदो बोधाई माऊली हो ||*

    *किंवा*
    *"लोक देखोनि उन्मत्त | दारांनी आसक्त ||*
    *न बोले बौद्धरुप | ठेविले जघनी हात ||"*
    *"धर्म लोपला अधर्म जाहला |हे तु न पाहसी || या लागे* *बौद्धरुपें पंढरी नांदसी ||*
    ...........

    *संत जनाबाई*
    ...........
    *होऊनिया कृष्ण कंस वधियेला |*
    *आता बुद्ध झाला सखा माझा ||*

    *लोक देखोनी उन्मत |*
    *दारांनी आसक्त*
    *न बोले बौद्धरुप*
    *ठेविले जघनी हात ||*
    ........

    *संत बहिणाबाई*
    ..........
    *कलियुग हरी । बुद्ध रुप धरी ।*
    *तुकोबा शरीरी प्रवेशला ।।*

    *संत तुकारामाच्या तोंडून साक्षात तथागत बुद्धच बोलत आहेत, असे संत बहिणाबाई सूचित करतात*

    *तसेच,....संत संप्रदाय *बुध्दालाच विठ्ठल मानताना म्हणतात -*
    *संत तया दारी, तिष्ठताती निरंतरी |*
    *पुंडलिकासाठी उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ||*
    *बौध्द अवतार घेऊन विटे समचरण ठेऊन |*

    *लोक देखोनि उन्मत्त दारांनी आसक्ता |*
    *न बोले बौध्द रूप ठेवीले जघनी हात ||*

    *भक्तीविजय* 
    ..........
    *कलियुगी प्रत्यक्षा पाषाण रूपी,*
    *बौध्दरूपे असता श्रीपती |*
    *जनांसी दाखवूनी नाना प्रचिती,*
    *वाढविली कीर्ती संताची ||*

    *संतविजय अध्दाय 10 महिपतीबुवा ताहाराबादकर(कांबळे)*

    *कलियुगामाजे साचार | असत्य भाषण झाले फार*
    *यास्तव बौध्द अवतार | देवे सत्वर घेतला॥*

    *स्वानुभव दिनकर* 
    ..........
    *कळिचा प्रातुर्भव देखोनी,*
    *बुध्दियोगे आवडे उगेपणी |*
    *बौध्दावताराचिया आयणी ||*
    .............

    *संत चोखोबा महार*
    .............
    *शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ।।१।।*
    *मी यातिहीन महार । पूर्वी निळाचा अवतार ।।२।।*
    *कृष्णनिंदा घडली होती । म्हणोनि महार जन्मप्राप्ती ।।३।।*
    *चोखा म्हणे विटाळ । आम्हा पूर्वीचे हे फळ ।।४।।*
    *(कदम ग्रंथ अभंग:पृ.11)*
    *चोखोबा महार "निळाचा अवतार" म्हणजे मूळ "नागवंश" होय. ( तथागत बुद्ध नागवंशिय होते)*
    *कृष्णाचा अंत नागवंशीयाकडून झाला. हीच कृष्णनिंदा झाली आणि म्हणून "महार" जन्म झाला असे चोखोबा या अभंगातून सांगतात*

    *चोखोबा "महार" अर्थात् अस्पृश्य जातीचे असुनही त्यांचे संपुर्ण कुटुम्ब वारीकरी संप्रदायाचे निष्ठावान वारिकरी बनुनी अमानवतावादि वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करित होते*
    *संत चोखोबा म्हणतात.....*
    *कली माजी देव बुद्ध रुप जाला |*
    *शरण शरणवाणी शरण तिवाचा विणवणी ||*
    *कली युगातिल बुद्ध आमचे दैवात आहे. त्याला त्रिवार शरण जातो*

    *संत चोखोबाची पत्नी संत सोयाराबाई* 
    .............
    *देहासी विटाळ म्हणती सकल |*
    *आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध* 
    *देहीचा विटाळ देहिच जन्मला*
    *सोवळा तो झाला कवण धर्म ||*

    *संत चोखोबाचा मुलगा संत कर्म मेळा*
    ...............
    *आमुची केली हीन याती |*
    *तुज का न कळे श्रीपती*
    *जन्म गेला उष्टे खाता*
    *लाज न ये तुमचे चित्ता ||*

    *संत चोखोबाचा मेव्हणा संत बंका महार आणि मुलगी संत निर्मला*
    .............
    *हाती न घेता तलवार*
    *बुद्ध राजकरी जगावर |*
    *ऐकोनी "बंका" करित उत्तर*
    *बुद्ध अवतार पांडुरंग* ||

    *सामाजिक आणि सांस्कृतिक विषमता नष्ट करण्याची भुमिका संत चोखोबा व त्यांच्या कुटुंबियांनी घेतली खरी, पण शेवटी ते आपल्या नशिबाला किंवा प्रारब्धाला शरण का गेले? कारण या काळात आपेगाव पैठणच्या ज्ञानेश्वरांच्या ज्ज्ञानेश्वरीच "कर्ममार्ग" तत्वज्ञानाचा समाज जीवनात मोठा प्रभाव होता*

    *आपेगावच्या ज्ञानेश्वरीची ज्ञानेश्वरीतील ही ओवी•••••••*
    *कर्म पराधिनपणे | निपजते प्रकृतिपूर्ण*
    *म्हणून संग जंव प्रकृतीचा | तंव त्याग त घड़े कर्माचा (ज्ञा.३:६ ३)*
    *कर्म अर्थात नशीब प्रकृतितुन म्हणजे पुनर्जन्मातुन निपजते, तेव्हा माणूस कर्माच्या बंधनातुन मुक्त नाही*

    *संत चोखोबांचे अख्ख कुटूंब विठ्ठलमय अर्थात् बौद्धमय झालेले पाहुन वैदिक ब्राह्मणाने संत चोखोबाची भिंती खाली चिरडुन हत्या केली* 
    *वैदिक ब्राह्मणाचा ऐवढा दहशतवाद की संत चोखोबाचे प्रेत भिंती खालुन काढण्याची कोणाचिही हिम्मत नव्हती*

    *"वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेने संत चोखाबाची केलेली हत्या, संत कबीर व संत रोहिदासा नंतरची तिसरी हत्या आणि महाराष्ट्रात झालेली संताची पहली हत्या होती.*

    *परंतु एक लक्षात असू द्या.........*
    *मरण आहे या सकळा* |
    *भेणे अवकळा अभयमोल* ||
    *मरणाच्या भिती पेक्षा मरणाची प्रतिष्ठा महत्वाची असते. जेव्हा संत चोखोबाच्या हत्या झाली तेंव्हा संत नामदेव उत्तरेत होते. संत नामदेवानी चोखोबाची हाडं एकत्र करून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीवर चोखोबाची समाधी केली*
    *अस्पृश्य जातीचे संत चोखोबा महार विठ्ठलाच्या पहिल्या पायरीचे तमाम संताचे प्रेरणा स्थान झाले.*
    *संत मनोभावे म्हणू लागले•••*
    *कलियुगी प्रत्यक्षा पाषाण रुपी* ।
    *बौद्धरुपी असता श्रीपती* ।।
    *जनांसी दाखवूनी नाना प्रचिती* ।
    *वाढविली किर्ती संताची* ।।
    *या सर्वांवरुन विठ्ठल हा बुद्धच आहे असं संत परोपरीने सांगताना दिसतात*.......

    *पंढरपूरचा विठ्ठल हा तथागत बुद्ध आहे हे झालं संतांची गाथेतिल अभंगवाणीचे पुरावे. आता आपण तथागत बुद्ध हा विठ्ठल आहे त्याचे प्रत्यक्ष पुरावे पाहुया*......

    *महाराष्ट्रात शीळाप्रेसवर पंचाग नवग्र जात असे, या पंचागाच्या मुखपृष्ठावर नवग्रह व दश अअवताराच्य चित्रात नवव्या अवताराच्या स्थानी विठ्ठलाचे चित्र छापत व त्या विठ्ठलाच्या खाली बुद् असे लिहिलेले असे......*

    *विचारवंत डॉ. रा.चि.ढेरे दोन पुस्तकांचा ऊल्लेख करतात पहले पुस्तक श्री विठ्ठल एक महासमन्वय आणि दुसरे म्हणजे श्रीराम सहश्त्रनाम ह्या स्तोत्राच्या पुस्तकात गरुड, हनूमान विठ्ठलाचे चित्र छापलेले असून त्याच्या खाली बुद्ध असे लिहिले आहे*

    *तसेच महाराष्ट्रात दोन मंदिर आहेत*

    *महाराष्ट्र - तासगांव - सांगली विंचूरकरांनी बांधलेले दक्षिणी शैलीचे गणेश मंदिराच्या गोपूरावर बुद्धाची मूर्ति आहे.*

    *कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या ओवारित बुद्ध मूर्ती दगडावर कोरलेल्या आहेत.*
    *संत नामदेव महाराजा पासून ते संत तुकाराम महाराजा पर्यंतच्या संताच्या वाणीतून आणि महाराष्ट्रातील लिखीत व कोरीव शिल्पातिल पुराव्यावरून सिद्ध होतं की पंढरपूरचा विठ्ठल तथागत बुद्धच आहेत*

    *आज जरी इतिहासतज्ञ, वैचारिक अभ्यासकांना संत आणि बुद्ध यांच्यातलं विचारधारेचं नातं माहिती असलं तरी सामान्य वारकरी म्हणवणाऱ्यांना हभप किर्तनकाराला बुद्धांविषयी प्रेम वाटत नाही.आपुलकी वाटत नाही. आदर वाटत नाही कारण वैदिकब्राह्मणी मनुवाद्यानी त्यांच्या मनात असं भरवलं आहे की बुद्ध आपला नाही, तो परका आहे, आपला बुद्धाशी काही संबंध नाही*
     
    *स्वतःला विठठलाचा वारकरी म्हणवणाऱ्या हभप किर्तनकाराच्या डोक्यात जातीयवादी, विषमतावादी, माणसामाणसात भेद करणाऱ्या वैदिकब्राह्मणी विचारांचीच पेरणी झालेली असल्यामुळे, त्यांच्या मनात जातीयवादी विचारांचं तण माजलेलं आहे*
    *डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्विकारल्यामुळे तर या अल्पबुद्धि लोकांच्या मनात बौद्ध धम्म आणि तथागत बुद्ध यांच्याविषयी अधिकच दुरावा निर्माण झाला आहे कारण वैदिक ब्राह्मणांनी त्याला खतपाणी घातले आहे.*
    *अशा परिस्थितीत या मूढ लोकांना आपल्या मूळ विचारांचं, धर्माचं भान आणून देण्यासाठी संत नामदेवा पासून ते संत तुकाराम महाराजांचा हे अभंग अतिशय महत्त्वाचा आहे.*
    *आपली परंपरा स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देणारी परंपरा आहे. लोकांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक गुलाम बनवणारी, उच्चनीचता पाळणारी, भेद पाळणारी, द्वेष पसरवणारी परंपरा आपली नाहीच ति वैदिक ब्राह्मणी मनुवादि परंपरा आहे तेव्हा*......
    *( संदर्भ: - उल्हास पाटील, गाथा परिवार)*

    *तुमचा गैरसमज दूर करा* --------------
    *"तथागत भगवान बुद्ध" हे केवळ 1956 ला धर्मांतरीत झालेल्याच लोकांचीच "विरासत" नाही तर तथागत भगवान बुद्धांचे तुम्ही-आम्ही तमाम बहुजन समाज "वारसदार" आहात तुमच्या वारसाहक्काचे पुरावे यथा योग्य पध्दतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आशा आहे आणि विश्वास देखील आहे की ज्या दिवशी बहुजन समाजाला इतिहासिक सत्यतेचे जेव्हा भान येईल तेंव्हा संतविचारांच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्धाचे विचार बहुजनां मध्ये रुजण्याला अनुकूल मनोभूमी तयार होईल. यासाठी वैचारिक मशागत करावी लागेल आणि ते केले तरच भविष्यात "बहुजनांचा बहुजनसमाज" निर्माण होऊ शकतो*.....
    •••••••••••••••••••••••••••••••••
    0 

    Add a comment

  2. बारकाईने वाचा आणि विचार करा ..
    .
    *_1) 33 कोटी देवांचे पैकी एका देवाचे संपूर्ण नाव सांगा?_*
    .
    *_2) सर्व देवानी भारतातच जन्म का घेतला इतर देशांत एकही देव जन्माला का नाही आला?_*
    .
    *_3) देवांचे ते पुष्पक विमान कुठे गेले ज्या मध्ये बसून ते नेहमी पृथ्वीवर यायचे?_*
    .
    *_4) आता का ते येत नाहीत?_*
    .
    *_5) विमानाचा शोध राइट बंधुनी लावला तर देवानी पैटर्न चोरल्याचा आक्षेप का नाही घेतला?_*
    .
    *_6) बऱ्याच देवाना बायका होत्या त्यातील काहिनाच् मूल झाले बाकीच्याना का नाही झाले?_*
    .
    *-7) पुराण काळा पासून तेहतीस कोटी देव होते ते ऐकत आलो त्या वेळी भारताची लोक संख्या 10 किंवा 20 कोटी असेल आता लोकसंख्या 120 कोटीवर गेली देवांची संख्या का नाही वाढली त्यांनी त्यावेळी काय साधने(मूल न होण्यासाठी) वापरली की नसबंदी केली होती?-*
    .
    *-8) खंडोबा जर देव आहे आणि कुत्रा जर खंडोबाचा अवतार आहे तर कुत्रे चावल्यावर लोक इंजेक्शन का घेतात उलटपक्षी देव चावला देव चावला म्हणत पेढ़े का वाटत नाहीत?-*
    .
    *-9) कोणताही देव देवी कोणत्याही माणसाची पार्श्वभूमी वस्तुस्थिति न बघता डायरेक्ट आंगात का येतो?-*
    .
    *-10) आपल्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताची सुरक्षा देव का घेत नाही?-*
    .
    *-11) ब्राम्हणाना गहु तांदुल सुपारी नारळ खारिक दक्षिणा काजू बदाम का देतां?-*
    .
    *-12) आपण आपल्या मुलाना काजू बदाम खारिक खायला घालतो का?-*
    .
    *-13) जर मुहूर्त नक्षत्र 36 गुण बघुन लग्न के नवरा बायकोचा घटस्पोट भांडने का होतात?-*
    .
    *-14) स्वर्ग नरक कोणी पाहून रिटर्न आलाय का मग स्वर्ग असा नरक असा हे हुबेहुब कसे पुस्तकात लिहितात?-*
    .
    *-15) पाश्चात देशात लोक गणपती व् इतर देवांची चित्रे आपल्या चप्पल अंडरवियर इत्यादी ठिकाणी वापरतात त्यांना देव का भस्म करीत नाही?-*
    .
    *-16) शंकराने देव असताना गणपतीचे मुंडके छाटले पण तेच मुंडके तो परत तिथे का बसवु शकला नाही त्यासाठी हतीचा बळी का घेतला बर मग हत्तीचे शीर माणसाला कसे फ़ीट बसले?-*
    .
    *-17) पार्वतीच्या मळा पासून गणपती जन्माला आला तर मग पार्वती प्रजनन करण्यास सक्षम नव्हती का?-*
    .
    *-18) पार्वतीने किती वर्षांपासून आंघोळ केलेली नव्हती जो तिचा एवढा मळ निघाला?-*
    .
    *-19) कपड्याचा शोध मानवाने लावला त्या अगोधर तो झाड़पाला खाऊन उदरनिर्वाह करीत असे मग मानवाच्या अगोदर असलेल्या देवांकडे एवढे भरजरी कपड़े व मिठाई कसे मिळत होते?-*
    .
    *-20) त्या काळी हवे तेव्हा जमिनीवर येणारे कोणालाही शाप देऊन भस्म करणारे आता तसे का नाही करत त्यांची पॉवर संपली आहे का की रिमोट ख़राब झाला?-*
    .
    *-21) आपल्या देशात अतिरेकी येऊन बॉम्बब्लास्ट करुण जातात देव त्यांना का आडवत नाही उलटपक्षी मंदिरातच बॉम्ब ठेवून जातात ते कसे?-*
    .*-22) मंदिरांच्या सुरक्षेसाठी लाखो पोलिसांचा बंदोबस्त का
    ठेवला जातो? देव स्वत:चे रक्षण करू शकत नाही तर भक्तांचे कसे करणार ?-*
    .
    *-23) 33 कोटी देवांच्या आरत्या पुजा विधी करणाऱ्या सर्व सामान्य व्यक्तीला गळफास लाउन आत्महत्या का करावी लागते?-*
    .
    *-२4 ) भक्तिभावाने देवदर्शनाला गेलेल्या भक्तांची गाडीला अपघात होवून भक्त मृत्यूमुखी का पडतात?-*
    .
    *-२5) मंदीरांमध्ये खिसेकापूपासून सावध रहावे का लिहीलेले असते?-*
    .
    *-२5) ३३ कोटी देव संरक्षणासाठी असताना हजारो कोटी रूपये देशाच्या सुरक्षेसाठी खर्च का केले जातात?-*
    .
    *-26) ब्राम्हण जे मंत्र म्हणून आपल्याकडून दान दक्षिणा उकलतात् पण त्या मंत्राचा अर्थ समजावून का सांगत नाहीत?-*
    .
    *-२7) गितेमध्ये श्रीकृष्णाने जेव्हा जेव्हा भारत देशात अधर्म माजेल व दुष्कर्म वाढतील तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी जन्म घेईन म्हटले होते कधी जन्म घेणार?-*
    .
    *28) अमुक देवस्थान जागृत आहे असे बोलले जाते मग तिथे पोलिस सरक्षण का ठेवले जाते?*
    .
    *२9)आपल्या देशात स्रिया देवाची पुजा ,व्रतवैकल्ये सर्वात जास्त करतात मग अत्याचार त्यांच्यावरच का केला जातो? एवढंच काय मंदिरामध्ये उत्सवांमध्ये देवासमोर त्यांची अब्रू का लुटली जाते?*
    .
    *30) देव आपल्या समोर वा मागुनही काहीही खात नाही तरी त्याला नैवैध हार तुरे पेढ़े नारळ का अर्पण केले जातात?*
    .
    *31) नैसर्गिक आपत्तीमध्ये नेहमी लाखो माणसे त्यात पुरूष, बायका व लहान मुलेही मरतात परंतु एखादा वाचला तर देव तारी त्याला कोण मारी असे का म्हणतात ? बाकी सारे वाईट असतात का?*
    .
    *32) सर्व सामान्य लोकांना देव कोप पावला असे सांगून घाबरविले जाते मग देवाचे नारळ हार पेढ़े मागच्या दाराने पुनः दुकानात नेणारे देवाला दिसत नाहीत का?*

    विचार कराल तरच तराल.......!!
    बघा जरा विचार करून  हॆ बरोबर आहे का......?
    0 

    Add a comment

  3. स्व. रविंद्र देवचंद मोरे एक झुंजार व्यक्तीमत्व 
    2013 साली एक उंचपुरा जवळपास 6 फुट उंचीचा उमदा तरूण माझ्याकडे आला त्याला त्याच्या वृत्तपत्राचे डीजाईन करून हवे होते अतिशय मनमिळाऊ आणि हुशार असा हा व्यक्ती तेव्हापासून माझा खास परिचयाचा झाला. लोकहीत टाइम्स नावाचे साप्ताहीक वृत्तपत्र चालवणारा हा तरूण गेल्या वर्षी कोवीडचा बळी ठरला. अगदी अचानक त्याच्या निघुन गेल्याच्या घटनेला काल 1 वर्ष पुर्ण झाले. रवि मोरे या नावाने त्याचा नंबर अजुनही माझ्याकडे सेव आहे. शेवटचे त्याचे माझे बोलणे झाले ते त्याने सुरू केलेल्या एका सामाजिक संघटनेबाबत त्याने एक ड्राफ्ट दिला होता त्याच्यात काही बदल करून त्याच्या फायनल पिडीएफ त्याला हव्या होत्या. त्याची एक गोष्ट लक्षात रहाते ते म्हणजे तो नेहमी फोन केल्यावर आपुलकीने बोलायचा काम आणि मैत्री याची त्याने कधी सरमिसळ केली नाही. रवि मोरे आणि त्याचे सहकारी व नातेवाईक हे सुध्दा तेव्हापासून माझ्या परिचयाचे झाले होते. त्याचा भाऊ गोकुळ मोरे त्यांचे सहकारी नंदू वराटे तसेच मोहन आगारे व इतर हे सुध्दा अनेक कामासाठी माझ्याकडे येत राहीले आहेत. संत रविदास समाजाचा एक उमदा नेता तसेच अतिशय हुशार व तल्लख बुध्दीमत्ता असलेला आणि त्याचबरोबर उत्तम शरीरयष्टी असलेला असा हा तरूण गेल्यावर्षीच्या कोवीड लाटेत हरवला. आजही तो गेला आहे असे जाणवतच नाही. तो आता आपल्यात नाही या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. 2013 पासून सतत काही ना काही कामासाठी किंवा एखादा सल्ला घेण्यासाठी मला त्याचे अधुनमधुन फोन येत होते.. हे लिहीण्यास मी एक वर्ष घेतले याचे कारण तो आपल्यातून गेला आहे याची जाणीव अजुनही नाही तो इथेच आहे आपल्यात आहे आणि आपल्यात राहणार आहे. भावपुर्ण श्रध्दांजली


    https://www.facebook.com/1815077541/posts/10215768216037774/
    0 

    Add a comment

  4. जातिभेदावर अलीकडे फार मोठे तत्वज्ञानी जन्माला आले जशी त्यांची Phd च आहे की काय जणू. अश्या तत्वज्ञानी लोकांनी आपली thesis पाठवावी म्हणजे आमच्याही ज्ञानात भर पडेल, इतक्या वर्षापासून आम्ही जे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय Scholar यांची ग्रंथ चाळली, फुले आंबेडकर रविदास यांच्या साहित्याचा अभ्यास केला, त्यांच्या ग्रंथाचा गठ्ठा बघून घरचीच वैतागली आहेत. (फक्त माहितीसाठी). जातीव्यवस्था ही भारताची मुख्य समस्या आहे आणि ब्राहमन वर्गाच्या शक्तीचे केंद्र सुद्धा आहे. जसे नेहमी सांगितले जाते की बहुजन वर्गाचा व्यक्ती 50 वर्षाचा झाला तरी बामनाच्या 5 वर्षाच्या मुला एवढी समज त्याला नसते. जाती या समस्येवर बोलणे लिहणे, विषयाचा दृष्टिकोन न समजता त्यावर टिप्पनी करणे हे आंधळ्या (दृष्टिकोनहीन) माणसाचे लक्षण आहे. जातीय हल्ले आणि समस्या या विषयावर न बोलने म्हणजे गुप्त रोग झाला आहे आणि कळू न देणे आणि बोलू ही न देणे अश्या या तत्वज्ञानी लोकांच्या बुद्धीवर हसू येते. म्हणून सखोल अभ्यास न करता मत मांडल्यास अडाणी माणसात गिणती होते. असे तत्वज्ञानी लोक समाजासाठी घातक आहे कारण हीच लोक ब्राहमनी व्यवस्थेसाठी Safety valve म्हणून काम करतात. जाती या विषयावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे मत मांडले आहे, ती मते त्यांनी रविदास महाराजांच्या साहित्यातून घेतली आहे.

    अधिक माहितीसाठी वाचा 
    Caste In India - Dr BR Ambedkar
    0 

    Add a comment

  5. मोठी वेबसाइट परवडत नाही छोटी वेबसाइट 2 हजारात डोमीन व होस्टिंग मोफत 9579277943
    0 

    Add a comment

  6. जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मूठभर सुशिक्षतानी घेतला पण त्याचे विश्वास घातकी वागणे आणि अस्पृश्य शोषितांबद्दलची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागेल. ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहे. ते फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी जगतात. त्याच्यापैकी एकहीजण सामाजिक कार्य करायला तयार नसतो ते आत्मघाताच्या वाटेने निघाले आहे.
                    माझ्या गैरहजेरीचा फायदा घेऊन आपल्या समाजातील काही स्वाभिमानशून्य माणसे दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिऊन तुमची दिशाभूल करतात. परंतु माझा विश्वास आहे की ज्याला स्वतःच्या समाजाचा स्वाभिमान आहे. तो आपली स्वावलंबनवृत्ती सोडून स्वाभिमान शून्य लोकांच्या आहारी पडणार नाही.

    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    0 

    Add a comment

  7. 🔹 समाजाची दिशाभूल करणाऱ्या पुढाऱ्यांवर कडक नजर ठेवली पाहिजे.🔹
             " सार्वजनिक काम करताना, समाजाचा पैसा देताना किंवा घेताना कोणी आपणाला फसवित तर नाहीना याचा संपूर्णपणे विचार करा. असा पैसा गोळा करणे व योग्य त्या व्यक्तीकडे पोहचता करणे हे तुम्ही तुमचे कर्तव्य समजले पाहिजे. कारण समाजाचा पैसा खाण्याची चाल अलीकडे फार बोकाळली आहे व त्याचा निदान मला तरी अत्यंत कंटाळा आला आहे. अशा लोकांना समाजातून हुडकून काढले पाहिजे व कोण समाजाला कशा धर्तीने फसवितो हे बारकाईने पाहिले पाहिजे.
              समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात. कार्याची कळकळ फार थोड्या माणसांना असते. सामाजिक कार्याचा उमाळा फारच थोड्या लोकांना असतो. बाकीचे सर्वजण शेणातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात. तेव्हा अशा लोकांना टोचून ' तू शेणातल्या किड्याचे जीवन जगतो आहेस' याची जाणीव करून देणे हे प्रत्येक सुशिक्षिताने आपले कर्तव्य समजले पाहिजे. समाजाची अशा धर्तीने दिशाभूल करणाऱ्या पुढाऱ्यांवर कडक नजर ठेवली पाहिजे. सामाजिक जीवनातील त्यांच्या चळवळीवर बारकाईने लक्ष पुरवले पाहिजे."
        🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    (संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण, खंड-१८, भाग-३, पान नं.३९२)
    मुंबईतील कामा हॉल मध्ये दि.१ जुलै १९५४ रोजी शेड्यूल्ड कास्टस फेडरेशन वॉर्ड कमिटी पुढील बाबासाहेबांचे भाषण.
    0 

    Add a comment

  8. ओबीसींना त्यांचे हक्क मिळावे न्याय व्हावा यासाठी 
    भाजपचे काही नेते कदाचित पूर्वीचा घटनाक्रम विसरले असतील म्हणून चुकीची टीका त्यांच्याकडून सतत होत आहे.  
    श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चा घटनाक्रम त्यांना आठवण व्हावा याकरिता महत्वाची माहिती येथे शेअर करत आहे. 

    ३१ जुलै २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षण कपातीचा अध्यादेश काढला.  

    १ ऑगस्ट २०१९ रोजी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी रवी कुमार ( Vice Chairman , Niti Ayog ) यांना पत्र लिहून ओबीसींच्या डाटा ची मागणी केली . 

    त्याच तारखेला म्हणजे १ ऑगस्ट २०१९ ला असीम गुप्ता यांनी सुद्धा विवेक जोशी ( Registrar General & Census Commissioner ) यांना पत्र लिहून ओबीसींचा डाटा मागितला . 

    या दोन्ही पत्रांवर २६ ऑगस्ट २०१९ रोजी श्री. जनार्दन यादव ( Upper Registrar ) यांनी देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री असताना राज्य शासनाला पत्र लिहून  कळविले की सोशल जस्टिस डिपार्टमेंट कडून आम्ही माहिती देऊ शकत नाही , तुम्ही थेट सोशल जस्टिस डिपार्टमेंट कडून माहिती घ्यावी. 

    १८ सप्टेंबर २०१९ ला तत्कालीन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सोशल जस्टिस डिपार्टमेंट कडे पत्र लिहून कास्ट  सेन्सस डाटा ची मागणी केली . यावेळी पत्रात त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला दिला हे महत्वाचं.

    १८ सप्टेंबर २०१८ ला पंकजाताई मुंडे यांनी केंद्रात राज्यमंत्री असलेल्या श्री. रामदास जी आठवले यांना सुद्धा पत्र लिहून डाटा ची मागणी केली , पण डाटा उपलब्ध करण्यास असमर्थ असल्याचे त्यांच्याकडून कळवण्यात आले . 

    २४ सप्टेंबर २०१९ ला असीम गुप्ता यांनी एन एस व्यकंटेश्र्वरम (Under Secretary To The Government Of India ) यांना पत्र लिहिले. 

    एन एस व्यकंटेश्र्वरम (Under Secretary To The Government Of India ) यांनी ( Principal Secretary ) यांना पत्र लिहिले. 
    पत्रात लिहिले की “This department is not in position to provide raw data of OBC “ म्हणजेच डाटा देण्यास असमर्थता दाखवली. 

    हे सर्व पत्र व्यवहार भारतीय जनता पक्षाच्या काळात झाले . 

    सर्व हक्क राज्य सरकारकडे आहे असे आज भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणत आहे , मग त्यांनी त्यावेळेस केंद्र सरकारकडे " डाटा" मागणीसाठी पत्र व्यवहार का केला ? 

    आज जे सल्ले हे राज्य सरकारला देतायत ते तेव्हा स्वतः सत्तेत असताना वापरून का नाही विषय मार्गी लावला आणि ओबीसींच्या हक्कांचे रक्षण केले ? 

    एक तर भाजप मधील नेते तेव्हा दिशाभूल करत होते , किंवा आज दिशाभूल करत आहे . पण एक मात्र नक्की की ते ओबीसींच्या प्रश्नांवर जनतेची दिशाभूल सतत करतायत.

    हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे , नेतृत्व क्षमता असलेल्या हजारो ओबीसींच्या हक्कांचा हा मुद्दा आहे , यावर राजकारण करून पोळी भाजू नये ही सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे . जे सूचना असतील समाधान असतील ते देण्यासाठी पुढे यावे राजकारण बाजूला ठेवून . 
    #ओबीसी #OBC #obcreservation  #maharashtra
    0 

    Add a comment

  9. मा. व्ही. पी. शिंग यांनी ओबीसी चा मंडल आयोग लागू करायाला तयार होते तेव्हा अत्मदहन करून विरोध करणारे संघ व बीजेपी वाले होते..
    .. ओबीसी चा मंडल आयोग लागू होऊ नये म्हणुन राम रथ यात्रा काढनारे संघ व बीजेपी वाले होते...
    .. ओबीसी ला आरक्षण देण्याची घोषणा झाली तेव्हा विरोध म्हणुन सरकार चा पाठींबा काढणारे संघ व बीजेपी वाले होते..
    .. ओबीसी ला आरक्षण संविधानिक हक्क मिळण्यासाठी ओबीसी जनगणना नाकारणारे संघ व बीजेपी वाले होते.. 
    .. केंद्रात मोदी सरकार असून ओबीसी आरक्षण हे केंद्राची बाब असल्यामुळे एका दिवसात आरक्षण देऊ शकतो परंतु देत नाही हे संघ व बीजेपी वाले.. 
    .. 
    .. जिंदगी भर आरक्षणाचा विरोध करणारे आता आरक्षणावर रस्त्यावर येऊन व ओबीसी चे आम्ही वाली आहोत म्हणुन आंदोलन करतात हा तर्क खरा वाटते का..? 
    आरक्षणाचा कायदा संसद मध्ये की रस्तावर..? 
    .. आता तुम्हीच ठरवा.. बीजेपी वाले तुमचे आहेत..?
    0 

    Add a comment

  10. ब्राह्मणों को मनुस्मृति क्यों प्यारी है तभी तो पुनः लागू करने की तैयारी है ?🙆
    ध्यान से पढ़ो एक ब्राह्मण के मन की बात,
    ब्राह्मणों का कहना है कि जब मनुस्मृति लागू थी तो हमारी मौजबाहार थी,
    👉एकलव्य का अंगूठा काट डाला-कोई विरोध नही,
    👉शम्बूक का सिर काट डाला-कोई विरोध नही,
    👉गर्भवती महिला को जंगल में छोड़ा तब भी--
    कोई विरोध नही
    👉मृत पति के शव के साथ जीवित पत्नी को भी जलाकर सती बना डाला--कोई विरोध नहीं,
    👉अपनी हवस मिटाने के लिए छोटी छोटी बालिकाओं को भी देवदासी बना डाला--तब भी कोई विरोध नहीं,
    👉अच्छे भले इंसानों के गले में मटकी और कमर में झाडू बांधकर उन्हें अछूत बना डाला--कोई विरोध नहीं,
    👉वेद वाक्य सुनने पर कानों में पिघला हुआ शीशा डाला गया और वेद वाक्य का उच्चारण कर लेने पर जीभ काट डाली--फिर भी कोई विरोध नहीं,
    👉जिन तालाबों में भेड़ बकरी एवं कुत्ते बिल्ली तक पानी पी सकते थे ऐसे तालाबों तक में पानी पीना अपराध घोषित कर डाला--तब भी कोई विरोध नहीं,
    👉मरे हुए जानवरों से लेकर इंसानों का मल मूत्र सिर पर उठाने को मजबूर कर डाला--फिर भी कोई विरोध नहीं,
    👉अस्त्र-शस्त्र एवं शिक्षा से वंचित कर अपना गुलाम तक बना डाला--फिर भी कोई विरोध नहीं।
    👉लेकिन मनुस्मृति के हटने एवं बाबा साहब अम्बेडकर द्वारा लिखा संविधान लागू होने के बाद सब बर्बाद हो गया 
    जिधर देखो उधर विरोध ही विरोध ???
    👉हैदराबाद में रोहित वेमुला की मौत पर विरोध,
    👉गुजरात का ऊना कांड पर विरोध,
    👉दादरी- अकलाख कांड पर विरोध,
    👉अलवर- पहलू खान कांड पर फिर विरोध 02 अप्रैल 2018- एससी-एसटी एक्ट को लेकर भारत बन्द के माध्यम से नाक में दम कर देने वाला विरोध,
    👉यूनिवर्सिटी में न्यू रोस्टर लागू होने पर भी भयंकर विरोध और अब ईवीएम को लेकर चारो ओर विरोध ही विरोध किया जा रहा है ये सब हमारे बर्दाश्त से बाहर होता जा रहा है,
    👉जो लोग हमारे नजदीक भी नही बैठ सकते थे, 
    वे मुख्यमंत्री और राष्ट्रपति की कुर्सी पर जा बैठे,
    👉जो लोग हमारे घरों के सामने से गुजरते समय अपने जूते पहनकर नहीं चल सकते थे वे आज कार में बैठकर घूम रहे हैं।
    👉जो लोग अपनी जाति विशेष के मोहल्ले में रहते थे वे आज हमारे पड़ोसी बन गए हैं,
    👉जो लोग हमारे चरण छूते थे आज उनके चरण छूने पर हमको मजबूर कर दिया है,
    👉जिनकी परछाई से भी अपवित्र होते थे वे आज हमारे दामाद बन गये हैं,
    👉जिनकी हमारे सामने बोलने की हिम्मत नही होती थी
    वे लोग आज प्रोफेसर बनकर हमें लेक्चर दे रहे हैं,
    👉पानी तो क्या बल्कि जिन्हें मटके को छूने तक नहीं दिया जाता था उनके चपरासी बनकर अपने हाथों से पानी पिलाना पड रहा है,
    👉जिनको घर में नही घुसने दिया जाता था वे लोग विधान सभा और संसद में घुस रहे हैं,
    👉जिनको नौकर तक नही बनने दिया जाता था वे आईएएस,आईपीएस,आईआरएस,डॉक्टर, इंजीनियर और जज तक बन रहे हैं हाय रे अम्बेडकर के संविधान तूने तो सब बर्बाद कर डाला लेकिन हम भी चैन से बैठने वाले नहीं  हैं सुबह-सुबह की सुहावनी नींद को छोड़कर रोज शाखाओं में जाते हैं वहां वापिस मनुस्मृति लागू करने की तैयारी में जुट जाते हैं🎅 
    (और हमारे लोग तो सुबह आठ बजे तक सोते हैं)😡
    क्योंकि मनुस्मृति हमें प्राणों से भी ज्यादा प्यारी है तभी तो डॉक्टर अम्बेडकर के संविधान को हटाकर वापिस मनुस्मृति लागू करने की पूरी तैयारी है
    👉इसीलिए बहुजन अब तुम भी वक़्त ना बर्बाद करके सब संविधान के लिए एक रहो रहेगा संविधान तो तुम ओर तुम्हारे बच्चें सलामत है नहीं तो जो पूर्वजों का  हाल था वही आने वाली पीढ़ी का होगा✍😢

    भारत मुक्ती मोर्चा
    0 

    Add a comment

Loading

Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास