पैलवान जिवाजी महार

  1. " पैलवान जिवाजी महार "

  2. उमरठ हे गाव तसं ३५० वर्षापूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
    सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे हे गाव.
    गावात चारचौकी वाडा होता तान्हाजीरावांचा.
    आज गावाची यात्रा भरली होती.गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.
    राजांची आणि तान्हाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची.मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.
    आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची ,त्यांचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.
    आणि त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे..हा हिरडस मावळातला ..वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल.
    वास्तविक सर्वजन शिवाजी राजाना पाहायला जमणार होते, आणि का नाही जमणार.??
    लेकीसुना, संत सज्जन ,गाइवसरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे .स्वराज्य आणले होते ..!
    मैदान खचाखच भरले होते.लहान मोठ्या कुस्त्याला प्रारंभ झाला.
    आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.
    राजीयानी पांढरा अंगरखा घातला होता..
    कृष्णा घोडीवर स्वार होते,आणि कमरेला  तलवार बांधली होती..जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते.
    राजे खाली उतरले ..
    तान्हाजीराव आपल्या फौजेसह राजाना भेटायला वाटेतच थांबले होते.रजानी तान्हाजीरावना मिठी मारली.
    तितक्यात खबर आली कि ,बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता .त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला .
    वाघाने त्यांच्या पायाला जबर दुखापत केली.
    मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने .
    हे ऐकून मैदान शांत झाले.खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन मैल आले होते.
    आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते
    '' मंडळी,लखू बेराडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.म्हणून तो आज लढू शकत नाही.
    या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल.असेल तर समोर या.''
    हि घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चीमेकडे कुजबुज सुरु झाली.
    एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता.सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.
    राजे सर्व पाहत होते.
    तितक्यात कोणतरी किंचाळला
    ''आरं आला रं जीवामहार आला ''
    राजांनी चौकशी केली तान्हाजीरावान्पाशी ..
    तान्हाजी म्हणाल..''राज ,ह्यो जिवाजी ,आपल्या हिकडचाच हाय,कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा.दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय ..याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होत..
    निजामशाहीचा दंगा झाला तव ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला..तेनच याला तयार केलाय.""
    राजांच्या चेहर्य्यावर एक तेज आले होते.
    कुस्तीची सलामी झडली .
    भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जीवाला नमवण्याचा प्रयत्न केला ,पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता.डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.
    भिकाजी ने उसन्या अवसानान पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला ,पण सावध जीवा ने फिरवून बाहेरची टांग लावली...भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.
    सगळ प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले.जीवाला अक्षरश डोक्यावर घेवून नाचू लागले 
    तितक्यात शिंगे -करणे गरजू लागली ..खुद्द राजे येत होते,
    पटापटा सर्व बाजूला झाले.
    राजीयानी हासत हासत जीवाला मिठीच मारली..मनात काय राजकारण होते माहित नव्हते मात्र राजे जाम खुश झाले होते..
    राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जीवाला बक्षीस दिले..आणि विचारले..
    जीव काय करतोस ??
    जीव उद्गारला ,'' काय नाय वरातीत पट्टा फिरवतो..दंगलीत कुस्त्या खेळतो''
    राजे हसले आणि म्हणाले ..''येशील आमच्या सोबत ...!!
    पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमान्च्यासोबत..!!
    आहे कबुल ..??
    जीवा हासला...होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला.
    आणि हाच तो जीवाजीराजे महार ज्याने अफजलखानाच्या अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला.
    
      आज जिवाजी महार यांची  ३०६ वी  पुण्यतीथी. जिवाजी महार यांच्या पराक्रमास मानाचा मुजरा ...!!!  
    म्हणतात ना होते जीवाजी
                        म्हणून वाचले शिवाजी                                                                          
    जय जिवाजी जय शिवाजी 
    1. Jivaji Mahale ase nav hote tyanche etehasa cha veparyas hou devoo naha chuk sudhara

      Reply
    2. Mahar prarakrami hote itihas sakshi ahe 1 jan 1818

      Reply
    3. चुकीची माहिती टाखु नका... जे खर आहे ते आहे.. राजे सर्वाचे होते आहे आणी राहणार... पण इतिहास कधिच बदलणार नाहि... जिवा महाला असेच वाचावे...

      Reply
    4. महार जात पराक्रमी होती.हे मुळात इतरांना मान्य
      नाही.सत्य स्वीकारले जात नाही.इतिहास करांनी जात बदलावली.मग आज सैन्यात न्हावी बटालियन नसती का?

      Reply
    5. जिवा महार किंवा जिवा महाले ह्यांच्या जाती बद्दल आणि नावा बद्दल कोणाकडे पुरावे आहेत का असेल गूगल वर माहिती टाका पण ते पुरावे खरे असले पाहिजे म्हणजे उद्या कोणी तुम्हाला विचारल्यावर तुम्हाला दाखवता आले पाहिजे

      Reply
    6. are jivaji mahale mhantat ani to nhavi samajyacha hota jivaji mahale yanche gaav vaai talukyat ahe 
      Ani jiva mahar vegla ahe to umarat gaavcha ahe doni vekti vegveglya ahet

      Reply
    7. He Mahale hote. Nhavi hote.

      Reply
    8. This comment has been removed by the author.

      Reply
Loading

Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास