उपेक्षित टकारी समाज
उपेक्षित टकारी समाज
टकारी समाज स्वराज्य निमिर्तीसाठी लागणारी धनदौलत इंग्रजांच्या तिजो-या फोडून आणण्याचे काम करत असे. टकारी समाज मुळचा आंध्र प्रदेशातील. त्या समाजाची तेलगू ही बोलीभाषा. तो समाज आंध्रात गोदावरी खो-यात पिढ्यान् पिढ्या राहत होता. त्या समाजाला त्या भागात भुमेनोरू म्हणजे भाड्याने जमिनी घेऊन कसणारा समाज म्हणून ओळखले जात होते. गोदावरी काठावर मासेमारी करायची, शेतीची कामे करायची व त्यातून उद्योग-उपजीविका करायची असा जीवनक्रम तो समाज पिढ्यान् पिढ्या करत आलेला आहे.
इतिहासात बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमप्रकरणात टकारी समाजाचा उल्लेख येतो. बाजीराव पेशव्यांचे मन मस्तानीवर जडले. ते तिला स्वतःच्या राज्यात घेऊन आले. तिच्या रक्षणासाठी त्यांनी विश्वासू, प्रामाणिक आणि लढाऊ असणाऱ्या उचल्या, टकारी समाजावर तिच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली. त्यानुसार बाजीरावांनी पुण्याजवळ असलेल्या पाबळ या गावी मस्तानीसाठी स्वतंत्र महाल बांधला. त्याभोवती टकारी समाजातील तरुणांना चोवीस तास पहा-यावर ठेवण्यात आले. त्यासाठी त्यांना तनखे देण्यात आले. त्या समाजाने मस्तानीचे चोख रक्षण केले. मस्तानी कधी कधी घोड्यावर बसून जवळच्याच तलावात अंघोळीसाठी निघाल्यावर तिच्या आजूबाजूला पहारा देण्यासाठी उचल्या समाजाचे हत्यारबंद रक्षक असायचे.

Comments
Post a Comment