वाडवळ समाज व संस्कृती
वाडवळ समाज व संस्कृती
सुमारे हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील उत्तरकोकणचा प्रांत ‘महिकावती नगरी’ किंवा ‘बिंबस्थान’ म्हणून ओळखला जाई. त्या परिसरातच वाडवळ समाजाची वस्ती आहे. ज्येष्ठ संशोधक अशोक सावे वाडवळ शब्दाची उपपत्ती ‘वाडवडील’ या शब्दातून शोधू पाहतात. ‘वाड’ म्हणजे मोठे-महान-कीर्तिवंत आणि ‘वडील’ म्हणजे पूर्वज. म्हणजे वाडवळांचे पूर्वज महान कीर्तिवंत असले पाहिजेत.
संक्षिप्त इतिहास
‘महिकावतीची बखर’ (लेखक - केशवाचार्य व इतर) हा प्राचीन दस्तऐवज आहे. बखरीत महिकावती राजधानी असलेल्या बिंब राजांचा इतिहास (वंशावळी) वर्णलेला आहे. बिंब राजे सोमवंशी व सूर्यवंशी क्षत्रिय राजे होते. ज्यांना वाडवळ असे संबोधले जाते ते त्यातील सोमवंशी राजांशी संबंधित आहेत. महिकावतीच्या बखरीबरोबर ‘बिंबाख्यान’(लेखक रघुनाथ पुतळाजी राणे), ‘अर्ली हिस्ट्री ऑफ बॉम्बे’ ‘उत्तर कोकणचा इतिहास’ (लेखक रा.ब. पु. बा. जोशी), ‘ओरिजिन ऑफ बॉम्बे’ (लेखक डॉ.. जी. द. कुन्हा) इत्यादी ग्रंथांमधून सोमवंशी क्षत्रियांचा इतिहास उपलब्ध होतो.

Comments
Post a Comment