Skip to main content

गावकामगार


गावकामगार

बलुतेदार आणि अलुतेदार हे खरे गावकामगार. काहीजण तलाठ्याला गाव कामगार समजतात. बलुतेदारांच्या आणि अलुतेदारांच्या यादींमध्ये एकवाक्यता नाही. एका यादीप्रमाणे

तर दुसर्‍या यादीप्रमाणे

हे बारा बलुतेदार आहेत. या दुसर्‍या यादीत, पहिल्या यादीतले कोळी आणि चौगुला नाहीत, आणि त्यांऐवजी महार आणि मुलाणी आहेत. 
तिसर्‍या एका यादीप्रमाणे सोनार हा बलुतेदार नसून अलुतेदार आहे.

अलुतेदारांच्या यादीत असेच गोंधळ आहेत. एका यादीप्रमाणे

  • कलावंत, कोरव, गोंधळी, गोसावी, घडशी, ठाकर, डवर्‍या, तराळ, तांबोळी, तेली, भाट, भोई, माळी, मुलाणा, वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी

हे अठरा अलुतेदार, तर दुसर्‍या यादीप्रमाणे 

  • कळावंत, घडशी, चौगुला, जंगम, ठाकर, डौरी, तराळ, तांबोळी, माळी, साळी, सोनार, चौगुला

हे फक्त बारा अलुतेदार आहेत. बाराच्या बारा अलुते कोठल्याही एका खेड्यात क्वचितच सांपडतात. कोठे कोठे वाजंत्री, गारपगारी वगैरे नवीन अलुतेदार आढळतात.

डौरी, डवरी, डवर्‍या आणि गोंधळी बहुधा एकच असावेत. मात्र, गोसावी आणि डवर्‍या गोसावी वेगळे आहेत. डवरी समाजामध्ये एक ’नाथपंथी डवरी’ समाज आहे. बहुरूप्याचे काम करणारे बहुधा ’डवरी’ असतात. डौरी नावाचे वाद्य वाजविणारेसुद्धा डवरीच असतात.

ग्रॅन्ट डफच्या मते कोळी, जंगम, तराळ, वेसकर, शिंपी, सोनार, यांचा हक्क महारांपेक्षा निराळा होता. सोनारालाचपोतदार असे म्हटले जाई. काही ठिकाणी ‘तराळ म्हणजे पाटलाजवळ सतत हजर असणारा, सरकारी अधिकार्‍यांची सरबराई करणारा, त्यांचे सामान वाहणारा महार’ असे म्हटले आहे. अशा महारालाच वेसकर म्हणतात, असेही काही जणांनी लिहिले आहे. गोंधळी, घडशीडवर्‍या गोसावी, तांबोळी, तेली, भिल्ल, माळी, रामोशी यांना नारूकारूच्या उलट अशी संज्ञा (म्हणजे काय?) आहे, असे ग्रॅन्ट डफ लिहितो. इतर ठिकाणी बलुतेदार म्हणजेच कारू आणि अलुतेदार म्हणजेच नारू असेही लिहिलेले सापडते.

Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास