गोसावी समाज
गोसावी समाज
गोसावी समाज हा सिन्नर तालुक्यामध्येसर्वत्र पसरलेला आहे. गोसावी समाजाची घरे तालुक्यामध्ये गावोगावी, खेडोपाडी, आढळून येतात. समाजाची जनगणना एक हजार एकशेआठ इतकी आहे. त्यांपैकी पाचशेऐंशी स्त्रिया, पाचशेअठ्ठ्याऐंशी पुरूष, एकशेतीन नोकरी करणारे, सहासष्ट व्यवसाय करणारे, एकशेसव्वीस घरकाम करणारे, तीनशेसात शिक्षण घेणारे, दोनशेनऊ शेती करणारे, नऊशेपन्नास मजुरी करणारे, पंधरा निवृत्त तर अवलंबून शून्य आहेत.
गोसावी समाज हा भटक्या जातींमध्ये मोडला जातो. त्यामुळे समाजाचे लोक घरी फार कमी प्रमाणात आढळून येतात. समाजाची प्रत्येक गावी चार-पाच घरे आढळून येतात. समाजात गोस्वामी, गिरी, पुरी, गोसावी इत्यादी प्रकारची आडनावे आढळून येतात. गोसावी समाजाला भगवान शंकराचे वरदान लाभलेले आहे असा समज आहे. सर्व गोसावी समाज एकत्र येऊन सिन्नरमध्ये दर महाशिवरात्रीला देवाची पूजा करतात, तेव्हा मात्र गर्दी उसळलेली दिसून येते.

Comments
Post a Comment