माझ्या समाजाची 'जातकुळी'

माझ्या समाजाची 'जातकुळी'

Submitted by Charudutt Ramti... on 24 September, 2016 - 23:26

भारतीय समाज व्यवस्थे मधे, ज्या काही अगणित अशा विक्शिप्त चाली रीती आहेत, त्यातली 'जात व्यवस्था' ही प्रामुख्याने एक. ह्या वाक्याचा अर्थ, आपल्या समाज व्यवस्थे मधे 'अगणित चाली रीती आहेत, मग चांगल काहीच नाही का?' तर उत्तर आहे, चांगल ही खूप काही आहे, पण सध्याचा विषय 'जात व्यवस्था हा आहे.' त्यामूळ फक्त चांगल तेव्हड छातिशि घट्टपणे कवटाळून आणि स्वत:वर कौतुकाची स्तुती सुमने उधळून समाज काळाच्या दिर्घशा आणि खडतर अशा प्रवासात तसूभरही पुढे सरकणार नाही. त्यामुळे, वाईटा वर ( दोष स्वत: मधे असले तरीही ) प्रहार करून ते समूळ नष्ट करून मगच समाजाच परिवर्तन, कळशीत भरलेल्या गढूळ पाण्या पासून, ते पिण्या लायक होणार्या वस्त्रगाळ पाण्यापर्यंत होणार.

तडक जाती व्यवस्थे वर जाऊन पोचण्या आधी, क्षणभर 'संस्कृती' ( कल्चर ) हा प्रकार चटकन समजून घेणे किंचित गरजेच आहे. संस्कृती ह्या विषयी पु. लं. ची एक टिप आहे. "शेवटी संस्कृती म्हणजे बाजरी ची भाकरी, वान्ग्याचे भरीत, गणपती बाप्पा मोरयाचि मुक्त आरोळी...केळी च्या पाना वरची भाताची मूद आणि त्या वरचे वरण... उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा घाट. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा घाट. मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी." आणि पुढे पु लं नी पुढे बरचस काही लिहून ठेवलय ह्या सुंदर संस्कृती बद्दल.

अशा ह्या अत्यंत सुंदर आणि शालिन अश्या संस्कृती नावाच्या 'मातेला' झालेला एक अनौरस अपत्य म्हणजे आपली सामाजिक जातीव्यवस्था. पण हे अनौरस अपत्य, वाढल आणि पोसले गेल ते मात्र 'संस्कृती' ने अंगावर पाजलेल्या दुधा ऐवजी, राजकारण्यांनी पेरलेल्या विशवल्लीच्या रसावर वर.

ही जाती व्यवस्था आली कुठून? बारा बलुतेदारि पद्धती मधून? मनु स्मृति मधून? मनु स्मृति मधून? की आपल्या सामाजिक गरजे पोटी? काय आहे, कुम्भारान त्याच्या पोराला चाक फिरवून मातीच भांड बनवायला शिकवल की ‘त्याच्या’ पोटा पाण्याचा प्रश्न सुटतो. आणि त्याच बरोबर समाजातल्या धनाढ्यांचाही ‘थंड’ पाण्याचा प्रश्न सुटतो. (इथे कुंभार हा फक्त कुठला तरी एक घ्यायचा म्हणून घेतलेल उदाहरण आहे ) 'पोट' पूर्ण भरल्या शिवाय गत्यंतर नसल्यामुळे कुंभाराचा मुलगाही मग त्याच्या पोराला 'रांजण' कस बनवायच ते शिकवू लागला. प्रश्न उद्भवतो तो 'नातू' ते काम आनंदान करत होता, दुखा:न करत होता, नीर्विकार पणे करत होता, की अपरिहार्यतेमुळे करत होतो. चार पिढ्यानंतर त्याला ही माहीत नव्हत की त्याला आता कुंभारा ला आणि त्याच्या पोरा लाही माहिती नसत, की तो 'जावा' किंवा ओरकल चे लेटेस्ट वरजन सेवन जरी शिकला तरी समाज त्याला 'कुंभार' च म्हणणार आहे. कारण कुंभाराच्या बाबतीत हे फारस महत्वाच नसल तरी 'मेलेली गुर ढोर आणि मैला' उचलणार्याच्या मुला बाबतीत हा प्रश्न 'गहन' ठरतो. कोण करेल आनंदान हे काम? मग प्रश्न येतो 'सामाजिक बळजबरीचा' . ही सामाजिक बळजबरी फक्त आपल्याच समाज व्यवस्थेत झाली ‘का’? किंवा, आपल्याच समाजव्यवस्थेत ‘का’ झाली? खर तर गोर्यांनी आफ्रिकेतील काळ्यान्ना बोटी च्या बोटी भरून नेल तेही त्यांच्या समाजातील ही 'उरली सुरलि' काम करण्या साठीच.

जस सत्ते पुढे शहाणपण चालत नाही म्हणतात, तसच 'संख्ये' पुढे ही शहाणपण चालत नाही, लोकशाही मध्ये हेही तितकेच खरे. आज हा प्रत्येक 'जात' जपणारा समूह आपल संख्याबळ दाखवण्या साठी अतीव उत्सुक आहे. कारण त्याला लोकशाहीत 'संख्याब ळा’ला किती अनन्य साधारण महत्व आहे, ते माहिती आहे. 'जात' जपणारा समूह आपल संक्या बळ दाखवण्या साठी अतीव उत्सुक आहे. कारण त्याला लोकशाहीत 'संख्या ब कळा लाला किती अनन्य साधारण महत्व आहे, ते माहिती आहे. जात हा शब्द थोडा 'प्रतिगामी' असल्या मुळे हल्ली लोक 'आमच्यात' 'तुमच्यात' किंवा 'आपल्या समाजात' 'हा आपलाच' 'बिरादारी एकच' हे पर्यायी शब्द शोधून काढून ते वापरतात. हा फक्त दुटप्पीपणा किंवा भोंदुपणा आहे (हाइपॉक्रेसी). एखाद्या सामाजिक परिवर्तनाच्या अजेंड्या खाली, मोजून पन्नास लोक जमा करण मुश्कील असलेल्या आपल्या समाजात 'जातीच्या' हिता साठी एक लाख आकडा अवघ्या आठवडा पन्धरवड्यात सहज गाठला जातो. आज 'डोमेस्टिक व्हायोलंस' ह्या मुद्द्या वर किती लोक जमा होतील? शंभर? पाचशे? बाराशे? एका अल्पवयीन मुली वर झालेल्या बलात्करा विरुद्ध फक्त 'त्या' समाजातील ( स्पष्ट बोलतो : जातीतील ) लोकांनी मोर्चाला याव ही हे अत्यंत वेदना दायी संकल्पना आहे. 'माणूस' म्हणून मोर्चा काढला तर फार लोक जमणार नाहीत ही अनामिक भीती कुठे तरी मनात शिल्लक राहतेच.

बर्याच लोकांना त्यांच्या जातीचा व्यर्थ (पण त्यांच्या मते सार्थ) अभिमान आहे, गंमत अशी की आमच्या ह्या 'जातीन' आम्हाला काहीच दिल नाही असा ज्यांचा आरोप आहे, त्यांनाही त्यांच्या जातीचा 'सार्थ' अभिमान आहे. आपल्या समाजात गेल्या दोन तीन दशकात हाय-वे हाय-वे वरचे मोबाइल टॉवर आणि घरा घरावरचे डिश टी. वि. अंटीना ज्या प्रमाणात वाढले, त्याच्या पेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात 'जात' फडकवणारे झेंडे वाढले. समाजात पुढे राहण्याचा अधिकार कोण्या एका ठराविक 'जाती जमातीचा' नाहीच. समाजात एखाद्याला त्याच्या जन्मदात्याने केलेल्या सामाजिक भूमिका / जावाबदार्या / बळजबरीने आयुष्यभर त्याच्या मुलाला पार पाडण्यास बळजबरीने भाग पाडणे इतका मोठा सामाजिक अपराध दुसरा नाही. परंतू...'जाती'च्या प्रलोभनामुळे दुर्बळ समाज कमी 'परिश्रमात' (आणि कमी 'खर्चात') एकवटला जातोय हा 'शोध' लागल्यावर आपला वापर परत एकदा 'मूठभर प्रस्थपितान्च्या' स्वार्था:साठी होणार नाही याची दक्षात 'एकवटलेल्या' समाजाने घेतली पाहिजे.

प्रश्न असा भेडसावतोय की पुढची शंभर वर्ष आता ही गेल्या पंचवीस वर्षांच्या तुलनेत अधिक सौम्य सौम्य होत जाणार की अधिक विषारी होत जाणार? जर माझ्या जातीन मला गेले कित्येकपिढ्या काहीच दिल नाही तरी अशी कोणती अदृश्य 'शक्ति' आहे जी मला ह्या जाती व्यवस्थे कडे खेचून आणते? हा 'सजातिय' विचार प्रवाह आपल्या समाजाला शेवटी कोणत्या स्थानी नेऊन ठेवणार? प्रगल्भ समाज जीवन पद्धती मधे खर तर धर्म आणि जात हे विषय, 'उंबर्या' च्या आतले. ते आपण मात्र 'वेस' ओलांडून देश पातळी वर आणले. नक्की च कुणी तरी 'जाणीवपूर्वक' आणले. आपोपाप थोडेच आले ?

आदर्श वादी राहण्यात फारस तथ्य नाही. तेंव्हा मनातला 'गांधी' मनातच ठेवायचा आणि कोणत्या तरी एका झेंड्याच्या सावलीत पांढार्या रुमालात गुंडाळून आणलेली भाकरी खायची, उन्हाचे चटके सहन करण्याची ताकद जेव्हडी फुले, कर्वे, आंबेडकर, कर्मवीर यांच्यात होती, तेव्हडी आपल्यात आहे असा गैरसमज करून घेण्याच्या नादात आपला 'नरेंद्र दाभोळकर' किंवा 'गोविंद पानसरे' व्हायचा. काय आहे, लोक विसरतात हो लगेच. दुख: म्हातारी मेल्याच नाही...पण काळ सोकावतो...!

चारूदत्त रामतीर्थकर
२५ सप्टेंबर १६. पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा

दोनदा लिहिलय

चांगलं लिहिलंय..

< अत्यंत सुंदर आणि शालिन अश्या संस्कृती नावाच्या 'मातेला' झालेला एक अनौरस अपत्य म्हणजे आपली सामाजिक जातीव्यवस्था> अनौरस कसं?

.

यापूर्वी पुरुषसूक्त काही लोक अभिमानाने म्हणाञचे ...

आता जाती वर्णाचा काही लोकाना फायदा राहिला नाही. म्हणुन ते आता जातीला अनौरस म्हणताआहेत

आरक्षणाने त्या पुरुषाचे पाय बांधून त्याला उलटे लटकवले. मग वरचे खाली गेले व खालचे वर आले.

आताची नवी आंदोलने त्या पुरुषाला पुन्हा पूर्वीप्रमाणे उभा करण्यास सुरु आहेत

उन्हाचे चटके सहन करण्याची ताकद जेव्हडी फुले, कर्वे, आंबेडकर, कर्मवीर यांच्यात होती, तेव्हडी आपल्यात आहे असा गैरसमज करून घेण्याच्या नादात आपला 'नरेंद्र दाभोळकर' किंवा 'गोविंद पानसरे' व्हायचा.

...

म्हणजे या हत्या जातीवर्णभेदाला विरोध केल्यामुळेच झाल्या आहेत , असेच समजायचे का ?

Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास