महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी


महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची संख्या ५९ आहे.[१]२०११ च्या जनगणनेनुसार, राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या १,३२,७५,८९८ (११.८१%) असून त्यात पुरुष ६७,६७,७५९ व स्त्रिया ६५,०८,१३९ आहेत. भारतातील एकूण २०.१४ कोटी अनु. जातींपैकी ६.६% अनु. जाती महाराष्ट्रात आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ (१९७६ चा १०८ वा) मधील परिशिष्ट १ मधील भाग - १० मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जातीतील ५९ प्रकारच्या जातींसाठी एकूण आरक्षण १३% आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये 

♨️महार(५७.५%), 

♨️मांग (२०.३%), 

♨️भांबी/चांभार (१२.५%) व 

♨️भंगी(१.९%) ह्या प्रमुख चार समाजाची लोकसंख्या ९२% आहे. 

👉लातूर जिल्ह्यात अनुसूचित जातींचे प्रमाण सर्वाधिक (१९.४%) आहे. २०११ च्या census नुसार 

👉पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अनुसूचित जातींचे प्रमाण आहे.संदर्भ हवा ]

यादी 

२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या समूदायांची आणि त्यांच्या लोकसंख्येच्या यादी खालीलप्रमाणे आहे.[२]

क्रमांकजातीलोकसंख्या २००१एकूण अनु.जाती लोकसंख्येची टक्केवारी
अगेर५९७%
अनमुक१४%
आरेमाला३८४%
अरवा माला४६५%
बहना बहाना१०९%
बाकड, बंट६७९%
बलाही, बलाई१३,६७१%
बसोर , बुरुद, बांसोर, बांसोडी४३,६१६%
बेडाजंगम, बुडगा जंगम४२,२०६%
१०बेडर१७,४६७%
११भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी,चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यबंशी, सूरज्यरामनामी, समगारा, चर्मकार, परदेशी चामार (शा.नि. दि. १५ एप्रिल २०१० प्रमाणे समाविष्ट)१२,३४,८७४%
१२भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली, हेला(शा.नि. दि.१५ एप्रिल २०१० प्रमाणे समाविष्ट)१,८६,७७६%
१३बिंदला६२९%
१४ब्यागारा१९%
१५चलवादी, चन्नया२,३८४%
१६चेन्नदासर, होलया दासर, होलेया दसारी४००%
१७डक्कल, डोक्कलवार४४२%
१८ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर९०,२२६%
१९डोम, डुमार३,३३७%
२०येल्लमलवार, येल्लमलवंडलु३,०१२%
२१गंडा, गंडी४२०%
२२गरोड,गारी३६१%
२३घासी,घासीया१,१९०%
२४हल्लीर९८%
२५हलसार, हसलार, हुलसवार, हुलसवार, हलसवार (शा.नि. दि.१५ एप्रिल २०१० प्रमाणे समाविष्ट)१००%
२६होलार, व्हलार७९,४६१%
२७होलय, होलेर, होलेया, होलिया१४,५८७%
२८कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्हे व राजूरा तालूका सोडून चंद्रपूर जिल्हा यांत)५,२३२%
२९कटिया, पथरिया१,९२१%
३०खंगार, कनेरा, मिरधा१,४०५%
३१खाटिक, चिकवा, चिकवी८९,९६९%
३२कोलूपूल-वंडलु१६%
३३कोरी९,७४९%
३४लिंगडेर१,१०,१९३%
३५मादगी५०,९९२%
३६मादिगा६,४३२%
३७महार, मेहर, तराळ, धेगू-मेगू५६,७८,९१२%
३८माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर१२,६१२%
३९माला७,९७३%
४०माला दासरी१,०९४%
४१माला हन्नाई२८%
४२माला जंगम१९,५८९%
४३माला मस्ती३१%
४४माला साले, नेटकानी१९४%
४५माला सन्यासी५६%
४६मांगमातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग२०,०३,९९६%
४७मांग-गारोडी, मांग-गारुडी२५,२६०%
४८मन्ने१,७२८%
४९मस्ती२०६%
५०मेंघवालमेंघवार३५,५९४%
५१मिठा, अयलवार३५,३२९%
५२मक्री७२%
५३नाडीया,हादी३४५%
५४पासी१६,६८३%
५५सांसी३८९%
५६शेणवा, चेणवा, सेडमा, रावत४१९%
५७सिंधोल्लू, चिंदोल्लू४६%
५८तिरगार, तिरबंदा१७०%
५९तुरी१८७%

Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास