मी एक पालक🌺
🌺विषय:- मी एक पालक🌺
मी एक पालक या नात्याने आज माझ्या लेखात फक्त आणि फक्त स्वत:चाअनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे.
"आधी केले मग सांगितले " या उक्ती प्रमाणे माझा मुलगा अवघ्या 6 वर्षाचा आहे.तरी तो कोणतेही पुस्तक वाचतो हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो.I am proud of my son.
असेच एकदा पहिलीच्या पुस्तकातील पहिलीच कविता 'आला पाऊस आला' वाचत असताना शेवटच्या ओळीतील 'आईच्या कुशीत' या शब्दा खालील त्याने रेषा ओढली.मी आश्चर्याने त्याला विचारले , काय रे बाळ,हे अस का केल? त्याच उत्तर ऐकून माझं हृदय हेलाउन गेल.तो म्हणाला,आईच्या कुशीत ती मूल दडुन बसलीत मग तू माझी आई आहेसना ? पटकन मी त्याला खरच माझ्या कुशीत घेतलं,आणि खुप पापे घेतले.
आणखी एकदा प्रतिज्ञावाचत असताना त्याने 'भारत' या शब्दा खाली रेघ मारली.त्याही वेळी विचारल्यावर तो म्हणाला ,भारत आपलाच देश आहे ना! म्हणून रेघ मारली.त्या ही वेळी माझा उर अभिमानाने भरून आला.हे का झाल? कशामुळे घडल ?या विषयावर चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आलं की,मी स्वत:एखादे पुस्तक वाचताना महत्वाच्या शब्दा खाली ओळी खाली रेषा ओढते हे त्याने पहिले होते .वाचलेल्या पुस्तकांचा सारांश मी लिहून ठेवते या वरुन मला एवढेच सांगावेसे वाटते,मुलांना उपदेश करण्यापेक्षा जर ती गोष्ट आपण स्वत: केली तर ती ,मूले ही न सांगता करतात.
प्रा.ग.प.प्रधान म्हणतात,मूल ही फूल असतात,त्यांना त्यांच्या आंतरीक उर्मिन फुलू द्यायच आसत.
परवाच घडलेला एक प्रसंग आहे.मी मुक्त कविता स्पर्धेसाठी कविता करत असताना माझा मुलगा जवळ आला आणि म्हणाला , आई,मी पण कविता करतो.मी सहज म्हटल कर आणि खरच त्याने पुढील ओळी कागदावर लिहिल्या
'घोड़ा आणि माकड फिरायला गेले ,
नंतर घरी आले ,
नंतर झोपले ,
नंतर सकाळी उठले'
कल्पना करा हे पाहून किती हर्षाने फुलून गेली असेल मी! एवढ सांगण्याचा उहापोह मी का करते कारण मूल ही अनुकरण प्रिय असतात.ती घरातील व्यक्ती,मित्र,शिक्षक यांचे अनुकरण करत असतात .म्हणून मला वाटते की मुलांवर संस्कार करणे हे पालक व शिक्षक दोघांवर अवलंबून आहे.
मुलांना शिवाजी महाराज, जिजाऊ , आंबेडकर,ज्योतिबा फूले ,सावित्रीबाई ,संत कबीर,संत तुकाराम,संत नामदेव ,भगतसिंग, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या गोष्टी मुलांना सांगून त्यांच्यावर चांगले संस्कार कसे करता येतील या साठी पालकांनी सतत प्रयत्नशील राहायला हवे .या प्रसंगी। " शिक्षका चल उठ आता" या वसंत हंकारे च्या पुस्तकातील पुढील ओळी आठवतात,
' म्हणून सांगतो पालका,
तू फक्त एवढंच कर,
या शूर विरांच्या विचाराच दान तु त्याला कर.'
मी अतिश्योक्ति नाही सांगत माझ्या मुलाने आत्ता पर्यंत आवंतर गोष्टींची विस पुस्तके वाचली आहेत हे सांगताना माझ हृदय अभिमानाने फुलून येतय.हे घरातील वातावरणा मुळे शक्य झाले मी आणि माझे पती सतत काही तरी वाचन करत असतात. घरात वर्तमानपत्र,स्वत:च ग्रंथालय आहे.तो आमचेच अनुकरण करतो .त्याने कमीत कमी 50चित्रे रंगवली आहेत.म्हणून म्हणते मुलांना शिकवायच नसत शिकू द्यायच असत .आपण फक्त त्यांना पोषक वातावरण निर्माण करायच असत! आम्ही त्याला पूर्ण स्वातंत्र्य देतो .
रेणूताई गावसकर म्हणतात,' मुलांनाही एक स्वत:च,स्वतंत्र अस अस्तित्व असत.'
माझ्या मुलावर जे संस्कार झाले ते माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते मी पुर्ण करणारच!शाळेतील प्रत्येक मुलाचे आदर्श पालक आणि शिक्षक व्हायचच आहे .
सर्व पालक वर्गाला एक विनंती करु इच्छिते ,ज्या गोष्टींची तुम्ही मुलांन कडून अपेक्षा करता त्याच गोष्टी अगोदर तुम्ही स्वत: कराव्यात मग बघा! कसा ' स्वप्नालाही सत्याचा स्पर्श होतो ते!'
शेवटी मी एक पालक म्हणून समस्त गुरुजी वर्गाकडून एक माफक अपेक्षा करते,
' हसत खेळत शिकवा गुरुजी,
सांगू तुम्हाला किती,
डॉक्टर इंजिनिअर नंतर बनवा ,
माणूस बनुद्या आधी. '
🌺धन्यवाद🌺
मिनाक्षी तुकाराम माळकर
चौसाळा ता.जि.बीड

Comments
Post a Comment