पालक नव्हे मित्र बना
पालक नव्हे मित्र बना
=====================
किती लवचिकता आहे शब्दात ! पालक म्हटली की, गंभीर स्वरूपाचे,दटावणारे आई बाबा दिसू लागतात.पण मित्र म्हटलं की, प्रेमळपणाचे वारूळ भेटते! खरचं आजकाल असं वातावरण घरा घरातून आहे कां ?
नोकरी,तंत्रज्ञान,शाळेची सतत बदलणारी गृहितकं ! हे पहाता मला वाटतं या आजच्या धावपळीच्या ,रस्सीखेचीच्या,स्पर्धेच्या,आत्मसम्मान वागविण्याच्या,पैशाच्या,इन्सटंट ,झटपट पाहिजेच्या,उधळ विचाराच्या,भडक जीवन शैली असलेल्यांच्या,महागाईच्या विळख्यात सांपडलेल्यांच्या,दुष्काळ पिडितांच्या,भूकबळी बनलेल्याच्या या जमान्यात सम + विषम परिमाणच पहायला मिळतं याला कारण पैसा आहे.तो मिळविण्यासाठी घरातील सारीच माणसं वेठीला धरली गेली आहेत.
जीव जन्माला येतो त्यावेळी त्याला अनेक नाती चिकटून येतात.आई बाबा आजी आजोबा काका काकू आत्या मामा त्या नात्यात तो जीव वाढू लगतो.पूर्वी एकत्र कुटुःब पध्दतिमुळे सगळ्या नात्यांचे भाव विभास ते मुल आत्मसात करीत असे. मग त्यात प्रेम,तडजोड,हेवा दावा न करणे,स्पर्धा न करणे. सांमजस्य ,समाधानी वृत्ति,देवाचे संस्कार हे सारं या नात्यातून मुलाला शिकायला मिळत असे.त्यामुळे घरात संस्कारांच रोपटं आपोआप फुलायचं ! ही मुस मुलाची आयुष्यभराची शिदोरी असयची! तेव्हा मनोरंजनाची साधने मर्यादित होती.मैदानी खेळ,अभ्यास,वाचन,मित्र मैत्रिणी म्हणजे मधाचे पोवळे असायचे!
विभक्त कुटुंबे निर्माण झाली ,बाबांच्या बरोबरीने आई नोकरीसाठी बाहेर पडू लागली. आजी आजोबा वृध्दाश्रमात भरती होऊ लागले.मनोरंजनाची साधने अचाट अफाट वाढू लागली.शाळा काॅलेजात सुध्दा पैशाशिवाय पान हलत नाही.हीही कारणे आई नोकरीसाठी बाहेर पडायला आहेतच आणखी खुप लिहता येईल .!----
आता आईच आपल्या मुलावर संस्कार करते .तीच मुलाच्या जास्त जवळ असते.बाबा नोकरी वा व्यवसाय करीत असतात.तेव्हा त्यांचीसुध्दा आपले मुल काय करते इकडे लक्ष दिले पाहिजे.तो काय करतो कुठे जातो,त्याचे मित्र कोण?त्याचा कोणत्या विषयाकडे कल आहे ?त्याची इच्छा आहे ती पैशाने पुरी करू शकू कां?ही जाणीव मुलाला विश्वासात घेऊन समजाऊन सांगितली पाहिजे !आई दिवसभर नोकरी करते --पण एकदा आई झाल्यावर आपल्या गरजा व छानछोकी बाजुला ठेऊन पूर्ण लक्ष आपल्या मुलावर केंद्रित केले पाहिजे.तो म्हणेल तेव्हा पैसे न देता त्याचा विनियोग मुलगा कसा करतो हे त्याला हाॅरॅस न करता पहाणे,वाचन ,शिक्षण, खेळ ,आजुबाजुच जग कसे ते समजावणे या सगळ्याला आईने वेळ द्यावा. शनिवार रविवार असतोच !नुसते मुलाला पैसे देऊन भागत नाही. निदान आईने तरी समजू नये.त्याच्यासर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे.
त्या विचाराना जीवघेण्या स्पर्धेपासुन वाचवले पाहिजे.तुझं माझं चे कुंपण मोडून काढले पाहिजे.अशा निकृष्ट विचाराना खतपाणी घालू नये.आहे त्यात समाधानी वृत्ति जोपासायला शिकविली पाहिजे.आठवड्याला त्याचे शिक्षक,मित्रमैत्रिणीना भेटून तो काय करतो कसं चाललं हे पाहिले पाहिजे.आईने आपलं तेच खरं वा आपल्याच कळते हा बाणा सोडून आपल्या मुलात रममाण व्हावं त्याचा सर्वागीण विकास पहावा.लहानपणी केलेले संस्कार वा दिलेले वळण कधीच कठेहि पुसले जात नाही.कारण विचार पक्के झालेले असतात.
आज डिव्होर्स,बलात्कार,खून,यांचं थैमान चालले आहे.इथं प्रेमभावनाच आटलेय !तडजोड
मिटून गेलेय! समतोल साधणं हे आजच्या पिढीच्या रक्तातच नाही.याचा पाया कुठे असतो घरकुलात असतो.आईमध्ये असतो. मुल कुणाकडे वाढतेय काका मामा आत्या यावरही अवलंबून असते.! रक्तच पातळ होत चाललयं तर सख्यत्व व मित्रत्व कसं जुळणार !
मुलाला जन्म दिला --कपडालत्ता ,स्मार्ट फोन ,खर्चाला पाॅकेट मनी दिला की कर्तव्य संपत नाही.
मुल हे भातीचा गोळा असते त्याला आकार द्यावा तसे ते घडते.
लहानपणापासूनच पालक जागरूक राहून त्याला आंजारून गोंजारून प्रेमाच,शिस्तिच,खरेपणाचं,निर्लोभाचं,सामजस्यचं,भूतदयैचं, तडजोडीचं,संघर्षाला तोंड देण्याचं,शिक्षणाचं बाळकडू हळूहळू मुलाच्या रक्तात भिनवलं तर ते मुल समाजात -पी जे अब्दुल कलामा सारखं मोठं कां नाही बनणार ? (इतकं मोठेपण नाही मिळालं तरी देशाला भुषणावह काम तरी करेल)
हे काम आई वा ज्यांच्यावर त्या मुलाची जबाबदारी असते ती मोठ्या माणसांनीच पार पाडली पाहिजे ! पालक या जड शब्दाच्या धाकापेक्षा मित्रत्वाच्या नात्याने जर मुलाशी संवाद साधलात तर ते मुलाच्या आयुष्यात मोलाचे ठरेल.!
अजून बरेच विचार थैमान घालत आहेत .
खुप प्रकल्प मनात असतात त्यासाठी --
पैसा+मॅनपाॅवर+जागा+वेळ हेही पाहावे लागेल ! या वयात ते आता शक्य नाही!
परंतु जेव्हढी विचारधारा होती तेव्हढी लिहली .वेळेही बंधन आहेच ! इथेच थांबते !✍
जय हिंद ञय महाराष्ट्र !🙏
==================
प्रेषक --कुंदा पित्रे (46)🍒
शिवाजी पार्क
दादर , मुंबई 28
9324746706

Comments
Post a Comment