महार समाज बारा बलुतेदारपैकीच एक होता सुतार लोहार चांभार महार मांग कुंभार न्हावी धोबी गुरव जोशी भाट मुलानी हे बारा बलुतेदार होते सोनार जंगम शिंपी कोळी तराठ/येसकर माळी/बागवान डवरी गोसावी घडसी रामोशी तेली तांबोळी गोंधळी हे बारा अलुतेदार होते लिस्ट चा संदर्भ :- History of Marathas - Grant Duff छत्रपती च्या सेनेमध्ये जातीप्रथा नव्हती सर्व लोक स्वराज्यासाठी आपल्या परीने मदत करत होते.महार लोकांना महाराजांनी गडांच्या बाहेर गडांची सुरक्षा करणे शत्रूची माहिती गडावर पोहचवणे छुपे मार्ग तयार करणे आणि त्यांची काळजी घेणे अशी कामे सोपवली होती. ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• महार (तत्सम जाती: मेहरा , मेहर , महारा , तरल , तराळ , धेगुमेग ) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रमुख्याने महाराष्ट्रात राहतो. हिंदू वर्णव्यवस्थेत या जातीला अस्पृश्य ( दलित ) मानले गेले होते. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ११% ते ...
महार जातीत १२ उपजाती होत्या. महारांच्या सोमस, लाडवन, बावणे मिराशी या मुख्य उपजाती आहेत, तर आंदवण, अक्करमाशी, बारमाशी या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे महारांत रायरंद, डोंब महार (तत्सम जाती: मेहरा , मेहर , महारा , तरल , तराळ , धेगुमेग अशा पोटजातीही आहेत. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने, महारांत एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटी-बेटी क्वचितच होत असत. मात्र इ.स. १९५६ मध्ये हिंदू धर्म त्यागून हा सर्व समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मीय बनला. बौद्ध व्यक्तींमध्ये कुणीही श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो या शिकवणुकीतून या समाजात रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेत आणि उपजातींचा हा भेद समाप्त झाला आहे.
भंडारी समाजाचा इतिहास, उत्पत्ती व विविध पोटजाती अशोक रामचंद्र ठाकूर 03/05/2015 विल्यम् मोल्सवर्थ यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ treasurer, तिजोरीवाला किंवा द्रव्यकोश साभाळणारा असा दिला आहे. पूर्वीच्या काळी, राज्याच्या भांडारावर देखरेख करणारे ते भंडारी असे मानले जाते. राजाच्या विरूद्ध बंड करणाऱ्यांचा पाडाव करून राजाची मर्जी राखणारे ते बंडहारी – भंडारी असाही एक समज आहे. ते ताडीमाडी काढण्याच्या व्यवसायाकडे अठराव्या शतकात वळल्याचे दिसते; तसेच, ते दारू गाळण्याचा व्यवसायही करत असत. भंडारी समाज मूळचा क्षत्रिय. तो राजनिष्ठ व लढवय्या होता. सखाराम हरी गोलतकर यांनी 1925 मध्ये ‘भंडारी ज्ञातीचा इतिहास’ हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यांची वस्ती कारवार होनावर्ते ते गुजराथच्या किनारपट्टीपर्यंत आहे.
Comments
Post a Comment