बाप मिञ सखा जीवनाचा आधारवड
साहित्य दरबार स्पर्धेसाठी लेख
बाप मिञ सखा जीवनाचा आधारवड
जन्मदाञी माय महान
गातो आवडीने तिचे गुणगाण ।
'बापही' तितकाच महत्त्वाचा
रक्त आटवून रंगवितो जो
आयुष्याचं प्रत्येक पान ।।
माझ्याच एका कवितेतील वरील ओळी आज बापाविषयी लिहीत असतांना एकदम काळजातून दाटून आल्या. आणि बापाविषयी लिहावच लागेल असं डोळ्यांमधून वाट मोकळी करत सांगू लागल्या.
लिहायचं म्हटलं तर 'बाप' हा विषयच मूळात एका लेखात वा काही पानांमध्ये सामावणारा नाही.... नक्कीच नाही!!
बाप हा अनेक रुपांमध्ये आपल्या मुलांना भेटत असतो, त्यांच्याशी हितगुज करित असतो.
कधी गुरु बनून ,कधी मार्गदर्शक म्हणून, कधी पालक वडील बनून, एवढेच काय कधी आई बनून ,तर कधी मिञ बनून, किती किती सांगावीत अशी नानाविध रुपं बाप लिलया पेलत असतो काळजाच्या प्रत्येक कप्यातून !
आपुल्या चिल्यापिल्यांच्या स्वप्नांना वास्तवाचे कोंदण देण्यासाठी सतत अविरत अखंड बाप जळत असतो समईतल्या वातीसिरखा !
तो दिवस मला अजुनही आठवितो-
नुकताच दहाविचा निकाल लागून काही दिवस झाले होते आणि पुढील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती. मला लहानपणापासूनच doctor बद्दल आकर्षण होतं आणि मनोमन मी माझं ध्येय निश्चित केलं होतं की आपण मोठे झाल्यावर doctor बनायचे. आणि त्या दिवशी नकळत माझ्या वडीलांनी मला प्रश्न विचारला कि तुला कशाला प्रवेश घ्यायचा आहे arts commerce कि science आणि मी बिनधास्त सांगितले science!!
मला doctor बनायचे आहे त्यावर वडीलांनी प्रतिक्रियां देणे टाळत चेहऱ्यावर एक उसने स्मित करीत मला ठीक आहे असे सांगितले. काळजात अनेक प्रश्न लपवून .........
माझी स्वारी जाम खुषीत होती कारण मला दहावीला छान गुण मिळाले होते शिवाय मी प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेलो होतो .त्यामूळे आपल्याला निश्चितच अकोल्यामधील नामांकीत महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळेल याची मला खाञी होती.
पण तेंव्हाच वडीलांच्या मनात काहीतरी सुरु असल्याची पुसटशी जाणीव मला व्हायला लागली. त्यातच माझी 11 वी science ची admission पण झाली पण college सुरु ह्वायच्या काही दिवस आधीच एका राञी वडीलांनी मला जवळ बोलाविले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्याशी वर व्यक्त केलेल्या नानाविध रुपांमधून ते कातरत्या व हळव्या स्वरांमध्ये बोलायला लागले.
अनु तू खूप हुशार नि गुणी मुलगा आहेस; आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. तू arts जरी घेतलंस ना तरी तू खूप मोठा होशील शिवाय नोकरी पण लवकरच मिळवशील.
आणि.........
कारण तुझ्यासोबत तुझ्या दोन भावंडांच पण शिक्षण सुरु आहे त्यांचाही खर्च .....
तू जर 'डी. एड 'केलंस तर खूपच छान होईल !
वडील माझ्याशी असं बराच वेळ बोलत होते. आणि उफाळून येणाऱ्या हुंदक्याना आतमध्येच दाबत होते. आमच्या कुटुंबाच्या तत्कालीन बिकट परिस्थितीचे रेखाचिञ मी त्यांच्या चेहऱ्यावर व डोळ्यांमध्ये पाहत होतो. त्यांच्या डोळ्यांमध्ये आमच्या कुटुंबाच्या काळजीचे डोह खोल जात असल्याचे मला जाणवत होते. आणि मग क्षणांर्धात कसलाही विचार न करता मी त्यांना मला 'डी. एड' करुन एक आदर्श शिक्षक बनायचे असल्याचे सांगितले.
कारण तो निर्णय त्यांनी माझ्यावर लादलेला नव्हता तर त्यांच्या रुपात एका सन्मिञाने मला अतीशय हळुवारपणे जगण्याची व जीवनाच्या सारीपाटाची ती उलगडलेली कला होती .
आणि तेंव्हापासुनच मी कल्पनेच्या प्रांतात रमण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवून जगायला शिकलो. आणि कदाचित म्हणूनच आज मी ज्या काही पदावर आहे त्याचे सर्व श्रेय माझ्या वडीलांच्या आणि माझ्यामधील मिञरुपी नात्याला आहे असे मला वाटते.
या प्रसंगावरुन मला आजच्या तरुण पिढीला आवर्जून सांगावेसे वाटते की थोडे आपल्या बापाला समजून घ्यायला शिका तद्वतच वडीलांनीही मुलांना वेळीच वास्तविक जगण्याचे भान मिञ बनून समजावून सांगितले पाहिजे .
कारण आजच्या या डिजीटल युगामध्ये बाप लेकातील सुसंवाद दिवसागणीक कमी कमी होत असल्याचे आर्वजून दिसून येते. फक्त खूप सारा पैसा कमविणे वा श्रीमंतीचा बेगडी लखलखाट मिरविणे म्हणजे जगणे नव्हे हे
आई -वडीलांनी समजून घेवून आपल्या मुलांना त्याची वेळीच जाणीव करुन देणे ही आज काळाची गरज आहे .
त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांना दडपणाखाली न ठेवता स्वच्छंदी पाखरांप्रमाणे ऊडू द्यावे . माञ तेंव्हाच आपल्या प्राणप्रीय पाखरांच्या पंखांमध्ये जिद्द व ध्येय गाठण्याचे बळ निर्माण करण्यासाठी त्यांच्याशी सतत त्यांचा सन्मिञ बनून सुसंवाद साधत राहणे खूप खूप गरजेचे व अत्यावश्यक आहे.
आजच्या या धकाधकिच्या जीवनामध्ये हीच गोष्ट मुलांच्या सैराट वागणुकीस कारणीभूत ठरत आहे कारण काही कारणांमुळे कुटुंबातील हा सुसंवाद दिवसागणीक कमी कमी होत असल्याचे आजच्या परीस्थितिवरुन स्पष्टपणे जाणवते .
म्हणावेसे वाटते की -
बाप म्हणजे मिञ सखा
बाप म्हणजे आधार ।
जीवनाला आकार देणारा
बाप असतो साथिदार ।।
✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
ता. जि. अकोला 444006
mo-9689634332

Comments
Post a Comment