प्रजापती कुंभार
ऐतिहासिक माहिती | Saamana (सामना)

>> अरुण मालेगावकर
♨️‘विठ्ठला, तू वेडा कुंभार’ असे गदिमांनी म्हटले आहे. त्या कुंभकाराचे महत्त्व प्राचीन काळात होते. आता आहे, यापुढेही कायम राहील.
♨️सोन्याचांदीची भांडी मोठ्या लोकांची, पण गरीबाकडे असतात गाडगीमडकी.
♨️पुराणग्रंथांमध्ये प्रजापती हा कुंभार असल्याची माहिती मिळते.
♨️जातवास्तवाचा शोध घेणे हे केव्हाही जिकिरीचे काम असते.
♨️असंख्य ग्रंथांमध्ये संदर्भ शोधून ते मांडताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते. ती दक्षता विलास राजे या संशोधकाने घेतली आहे.
♨️‘प्रजापती कुंभार’ या ग्रंथाचे एक शोधग्रंथ म्हणून महत्त्व मोलाचे आहे.
भगवान दक्ष प्रजापती (भगवान शंकराचे सासरे आणि त्याची पहिली पत्नी सती हिचे पिताश्री!) यांनी सर्वप्रथम कुंभनिर्मिती केली.
♨️मात्र कालांतकराने कुंभार ज्ञातीला समाजापासून दूर ठेवले जाऊ लागले.
♨️सध्या त्यांच्या जगभरात अनेक उपजाती आहेत. त्यातही मुस्लिम आहेत.
♨️युरोपियन ख्रिस्ती धर्मीय असून त्यांची संक्षिप्त ऐतिहासिक माहिती वाचनीय आहे.
♨️कुंभार बांधवांचे देव कोणते, देवता कोणत्या त्यांच्या श्रद्धा (आणि अंधश्रद्धासुद्धा!) कोणत्या हेही एक अभ्यासक म्हणून विलास राजे यांनी नोंदविल्या आहेत.
♨️अखेरच्या प्रकरणात
👉रत्नाप्पा कुंभार,
👉देवराज अरस,
👉न्यायमूर्ती एन. कुमारय्या
वगैरे देशी आणि
👉प्रा. सूत झल्ली,
👉मियाँ मुनीर रहमानी
वगैरे विदेशी थोऱयामोठय़ांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. ज्ञानाबरोबरच हे पुस्तक उद्बोधक आहे.
प्रजापती कुंभार
लेखक – विलास राजे
प्रकाशन – संवेदना प्रकाशन, पुणे
पृष्ठ – 112, मूल्य – रुपये 160/-
महर्षी व्यास-कौरव.
Comments
Post a Comment