महार समाज : महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी

महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. श्री. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र याचा अर्थ "महारांची भूमी" असा होतो.


                              इतिहास


महार हा गावाचा हरकाम्या. तो ओरडून दवंडी देई. प्रेताचे सरण वाही. जागल्या म्हणजे पहारेकरी. हा बहुधा महार जातीचा. 

गावराखण करणाऱ्या महाराला चारी सीमा बारकाईने माहीत. म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची. 

वेसकर या महाराने वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे. 

महार या जातीचे लोक महाराष्ट्रात कोकण, नागपूर, वर्धा, भंडारा, चांदा इत्यादी ठिकाणी आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. 

आर्य लोक [[भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.


महारांचे स्थलपरत्वे अनेक पोटभेद झाले आहेत. त्यांपैकी सोमवंशीय, लाडवण, आधवण, बावने, बारके, कोसरे, लाडशी, साळवे, धार्मिक, पान, बेल, झाडपे, कथिये व डेहरे हे प्रमुख होत. सोमवंशीय जातीच्या महारांची वस्ती दक्षिणी खानदेश व वऱ्हाड या ठिकाणी आढळते. बाकीच्या महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. 

सोमवंशी महार आपण पांडवाच्या वंशांतले आहोत असे म्हणवून घेत. त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबा, म्हसोबा, खंडोबा, ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादी होत. 

वऱ्हाडप्रांतामध्ये ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करतात असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच आहेत. ग्रामपंचायतीत बाराबलुतेदारांपैकी महार एक होते. त्यांच्याकडे खेडेगांवच्या सरहद्दी संभाळणे, चौकीदारी व जासुसी इ. कामे असत. [२]


                    1. महार कोण होते?


या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहीत आहे ते असे:
१. महार समाजाचे वास्तव्य गांवकुसाबाहेर होते. 

२. महार समाज हा ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हते तर जबाबदारी होती. गावात चोरी झाली तर चोराला शोधणे आणि सापडला नाही तर चोरी गेलेल्या मालाची नुकसान भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 

३. चोरांचा माग काढणे, गावात येणाऱ्या जाणाऱ्याची नोंद घेणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे काम होते. 

४. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भभवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 

५. महारांची स्वतंत्र चावडी असे व तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 

६. व्यापारी जेव्हा आपले तांडे घेऊन निघत तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त करत. 

७. महार हे लढवय्ये (मार्शल रेस) आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करून महार रेजिमेंटच बनवली. पेशवाईच्या अस्ताचा बहुमान महारांच्याच पराक्रमाकडे जातो. 

८. पेशव्यांनीही अंगरक्षक/पहारेकरी म्हणून आधी महारांनाच प्राधान्य दिले होते. 

९. महार हे ग्राम/नगर/राज्य परिप्रेक्षात गुप्तहेराचे काम करत. काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटलाला वा नगराध्यक्षाला देत असत. एवढेच नव्हे तर भटक्या जातींचे लोक, उदा० नंदीवाले, गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी वास्तव्यास आले तर त्यांची संपूर्ण माहिती घेणे व गाव पाटलास देणे हे त्यांचे कर्तव्य होते. 

१०. महार समाज अस्पृश्यगणला गेलेला होता. 

११. महारांवर शेतसारा/खजिना योग्य ठिकाणी पोहोचवण्याची तसेच सरकारी आज्ञा/संदेशादीं दळनवळनाचेही काम होते.


सर्वप्रथम महार या शब्दाचा उगम पाहता यासाठी पूर्वी अनेक विद्वानांनी व इरावती कर्वेंसारख्या विदुषींनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 महार राहतात ते राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्याख्या महाराष्ट्राच्या नावाशी संबंधित आहे...महार या नावाच्या उगमाशी संबंधित नाही त्यामुळे तिचा येथे विचार करण्यात अर्थ नाही.


मृताहारी" (म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणून) या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असे इरावती कर्वेंचे म्हणणे आहे. ते मुळीच पटण्यासारखे नाही.

 बुद्ध धर्मात निसर्गत: मृत प्राण्याचे मांस खाण्यावर बंधन नव्हते. पण मग असे मृताहारी बुद्ध धर्माच्या इतिहासात अगणित झालेले असतील. त्यांना सर्वांनाच "महार" म्हटले जात नाही. केवळ महाराष्ट्रात व आसपासच्या प्रदेशात या नावाची जात आहे, म्हणजे महार शब्दाचे मूळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे.


महाआहारी (खूप खाणारे) असणाऱ्या लोकांना महार म्हणू लागले अशी व्युत्पत्ती दि महार फोल्क (रॉबर्टसन) मध्ये दिलेली आहे. ती अर्थातच पटण्यासारखी नाही. दुसरे असे की महार एक जात म्हणून कोनत्याही स्मृती/पुराणांमध्ये उल्लेखिलेली नाही. अस्पृश्यांच्या यादीतही ही जात पुराणांनी व स्मृतींनी नोंदलेली नाही. मनुस्मृतीत निषाद, बेण, आयोमेद, आंध्र, चुंचु, धिग्वन या जातींचा उल्लेख आहे आणि त्यांनी गांवाबाहेर रहावे असे म्हटलेले आहे, पण चांडाळ वगळता त्यांनाही अस्पृश्य म्हटलेले नाही. तैत्तिरीय ब्राह्मणानुसार व विष्णुस्मृतीनुसार फक्त चांडाल ही जात अस्पृश्य आहे. त्यामुळे मुळात जन्मभूत अस्पृश्यता भारतात नेमकी कधी आणि का आली हे सांगता येत नाही.


वर्णसंकरातून अस्पृश्य जातींचा विकास झाला हे मनुस्मृतीचे मत मानव वंश शास्त्राने खोटे ठरवले आहे. मनुस्मृतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात महार, मातंग, धेड, परिया, चिरुमा, नामशूद्र, मेघवाल इत्यादी भारतात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचा उल्लेखही नाही.


याचाच अर्थ ९-१० व्या शतकानंतर (म्हणजे स्मृतिकाळ संपल्यानंतर) कधीतरी या जातींना अस्पृश्य बनवले गेलेले दिसते.


मग प्रश्न असा उद्भवतो की "महार" ही मुळात जात होती काय?


महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय?


महार समाजातील प्रमुख आडनावांमध्ये आढाव, आडसुळे, अहिरे, अवचट, भेडे, भिलंग, भिंगार, भोसले, कांबळे, साळवे, गायकवाड, पवार, कदम, शेळके, शिंदे इ. आडनावे आढळतात. 

या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीयांतही (ओबीसींसह) प्रचलित आहेत. याचाच अर्थ हे सर्व समान आडनाव असणारे समाजघटक कधीतरी एकत्र होते आणि व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या तसतशा वेगवेगळ्या जाती एकाच समाजघटकांतून कालौघात विभक्त झाल्या. जाती जन्माधारित बनत गेल्याने जातिधर्म आणि समाजधर्मात काहीसे विभाजन झाले.


त्यामुळे महार समाज हा सर्वस्वी स्वतंत्र वंशातून विकसित झाला आहे असे मानता येत नाही. हा समाज मुख्य दैवतांना मानत आला आहे...(शिव/विष्णु/विट्ठल/महालक्ष्मी इत्यादी). त्याचबरोबर या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अस्पृश्यतेच्या काळात अन्य मंदिरात स्थान व प्रवेशच नसल्याने आपल्या धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसित होतात हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्या दैवतांबाबतही पाहू शकतो. 

धनगर समाजानेही ते अस्पृश्य नसले तरी स्वतंत्र दैवते निर्माण केलेली आहेत.


म्हणजे महार जातीत सर्वच मानवघटकांतील लोक सामाविष्ट आहेत असे म्हणता येते. कोणतीही जात एकाएकी स्वतंत्रपणे उदयाला येत नाही. त्या त्या व्यवसाय-सेवाक्षेत्रांचा जसजसा विकास होऊ लागतो तसतसे त्यात अन्य समाजघटकांतील लोक आवडीने वा चरितार्थ प्रवेश करतात व त्यानुसार एक पेशा बनतो. भारतात त्यांना "जात" बनवले गेले.

आता सर्वप्रथम आपण "महार" या शब्दाचा उगम शोधला पाहिजे. भारतातील बव्हंशी जातींची नावे ही व्यवसायाधारित आहेत. म्हणजेच महार शब्दाचा उगमही व्यवसायाधारित असला पाहिजे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. त्यासाठी सुरुवातीलाच कथित केलेले महारांचे व्यवसाय पुन्हा एकदा तपासल्यास,


अ. महार हे ग्रामरक्षक होते...चोऱ्या-दरोडे व आक्रमणेही परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती. 

गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यकच बनले होते. त्यांच्यामुळेच वेशीआतचे लोक निर्घोर झोपू शकत होते. त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती. 

त्यांनाच भूमिपुत्र मानले जात होते. कारण त्यांच्या साक्षीनेच जमीनींच्या तर सीमा ठरतच होत्या पण संरक्षितही रहात होत्या.


ब. इसवी सनाच्या पहिल्या सहस्रांतापर्यंत प्रादेशिक व्यापार कराता, परक्या मुलुखातू जावे लागे. जाताना चोर-दरोडेखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक-पथके व्यापारी सोबत बाळगत असत. महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवय्या अशी राहिलेली आहे.
म्हणजेच गावाचे/व्यापाऱ्यांचे "रक्षण" हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते.


या दोन मुद्द्यांवरून स्पष्ट दिसते की "महार" हा शब्द "महारक्षक" (वा प्राकृत महारक्खित-महारक्ख) या शब्दाचा कालौघात झालेला संक्षेप आहे. 

जी सामाजिक कर्तव्ये महार समाज पार पाडत होता त्यावरून हीच व्युत्पत्ती महार या शब्दाचा उलगडा करते, अन्य कोणतीही नाही हे सिद्ध होते. ही कर्तव्ये तत्कालीन राजकीय अस्थिरता, धामधूम आणि कधी पूर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्वाची होती. त्याशिवाय ग्रामाधारित समाजव्यवस्था जिवंत राहूच शकत नव्हती.

संकलन : सुमित रवि सरवदे

Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास